---Advertisement---

भारतीय खेळाडू देशासाठी नाही तर स्वत: साठी खेळतात

On: गुरूवार, एप्रिल 23, 2020 4:12 PM
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तानमधील वाद सर्वांनाच माहिती आहेत. हे वाद क्रिकेटमध्येही पहायला मिळतात. खेळाडूंच्या विधानामुळे तणावाचे वातावरणही निर्माण होते. अशाच प्रकारे पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने भारतीय संघाबद्दल मोठे विधान केले आहे.

पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजाच्या (Ramiz Raja) यूट्यूब चॅनेलवर चर्चा करताना इंझमाम (Inzamam Ul Haq) म्हणाला की, “जेव्हा पाकिस्तानचे खेळाडू भारताविरुद्ध खेळत होते, तेव्हा भारतीय संघाची फलंदाजी आमच्यापेक्षा मजबूत होती. पाकिस्तानचे फलंदाज ३०, ४० धावा जरी करत असले तरी त्या धावा संघासाठी होत्या. परंतु भारतीय संघाचे याउलट होते.”

“भारताच्या खेळाडूंनी (Indian Players) १०० धावा जरी केल्या असल्या, तरी त्या धावा स्वत:साठी असायच्या. फक्त येवढाच काय तो फरक त्याकाळी भारत आणि पाकिस्तान संघामध्ये होता,” असेही इंझमाम यावेळी म्हणाला.

याव्यतिरिक्त या चर्चेदरम्यान इंझमामने इमरान खानच्या (Imran Khan) नेतृत्त्वाचीदेखील प्रशंसा केली. तो यावेळी म्हणाला की, “तो अधिक टेक्निकल किंवा रणनीती बनवणारा कर्णधार नव्हता. परंतु आपल्या खेळाडूंवर तो पूर्ण विश्वास ठेवत होता. एखाद्या खेळाडूमधून सर्वोत्तम कसे मिळवावे हे त्याला माहित होते.”

“त्याच्या या कौशल्यामुळेच तो महान कर्णधार बनला होता. जर कोणत्याही खेळाडूने एका मालिकेत चांगली कामगिरी केली नसेल, तर तो त्या खेळाडूला संघाबाहेर करत नव्हता. त्यामुळे सर्व संघातील खेळाडू त्याची खूप आदर करत होते,” असेही इंझमाम यावेळी म्हणाला.

पाकिस्तानचा (Pakistan) संघ ९०च्या दशकात भारताविरुद्ध खूप सामने जिंकत होता. तरीही यानंतर भारतीय संघ मजबूत बनत गेला. तसेच पुढे पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध अनेक सामन्यात पराभूत होऊ लागला. याव्यतिरिक्त सध्या भारतीय संघ जगातील अव्वल क्रमांकाच्या संघांपैकी एक आहे. परंतु आपसातील तणावामुळे भारत आणि पाकिस्तान संघात आता फार सामने होत नाहीत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-रविंद्र जडेजाच्या आधी या खेळाडूला संघसहाकरी म्हणायचे सर

-टीम इंडियात निवड न झाल्याने रात्रभर रडला होता विराट, या व्यक्तीला विचारली होती कारणं

-कॅप्टन कूल धोनी पुन्हा कर्णधार, टीम इंडिया नाही तर संघात मिळाली संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---