पुणे: इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीगमध्ये चुरशीच्या झालेल्या लढतीत मुंबई चे राजे संघाने आपल्या पहिल्या सामन्यात तेलुगू बुल्स संघावर 34-33 अशा फरकाने विजय मिळवत चमक दाखवली.
पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईचे राजे व तेलुगु बुल्स संघात सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली.
पहिल्या क्वॉर्टर मधील सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये सामना 7-7 असा बरोबरीत होता.
तेलुगूच्या बचावफळीने मुंबईच्या दोन खेळाडूंना बाद करत क्वार्टरअखेरीस 9-7अशी आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये देखील अशीच चुरस पाहायला मिळाली.
एक-एक गुणांसाठी दोन्ही संघातील खेळाडू मेहनत घेताना दिसत होते.
दुसऱ्याक्वॉर्टरमध्ये मुंबई चे राजे संघाच्या खेळाडूंनी चमक दाखवण्यास सुरुवात केली. विजय राजपूतने चढाईत चमक दाखवत मुंबई साठी गुणांची कमाई केली.त्यामुळेमध्यंतरापर्यंत मुंबई चे राजे संघाकडे 20-14 अशी आघाडी होती.
तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये तेलुगू बुल्स संघाने जोर लावला. त्यांच्या मनोज कुमार या चढाईपटूने गुण मिळवत मुंबईची आघाडी 23-19 अशी कमी केली.
चौथ्या क्वार्टरमध्ये तेलुगू संघाने गुणांची कमाई करत सामन्यातचुरस निर्माण केली.तेलुगु संघाने गुणांची कमाई करत सामना 29-29 असा बरोबरीत होता.
एकवेळ तेलुगु संघाकडे 32-30 अशी आघाडी होती.
पण, मुंबईच्याचढाईपटूने एकत्र तीन खेळाडूंना बाद करत 34-32 अशी आघाडी घेतली.
यानंतर तेलुगु संघाला केवळ एकच गुण मिळवता आला व मुंबईच्या संघाने अवघ्या एकागुणाने विजय मिळवला.