आयपीएल 2023 मध्ये रविवारी (30 एप्रिल) दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला गेला. हा आयपीएल इतिहासातील 1000 वा सामना ठरला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने मैदानात पाऊल ठेवताच काही विक्रम आपल्या नावे केले. विशेष म्हणजे रोहित रविवारीच आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.
आयपीएलसाठी रविवारी एक मोठा दिवस होता. सोळाव्या वर्षी आयपीएल इतिहासातील 1000 वा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. आयपीएल इतिहासात एकही चेंडू न टाकता रद्द झालेले 7 सामने देखील यामध्ये समाविष्ट आहेत.
Cake cutting mein attitude toh aisa ki 5️⃣ time IPL winning captain ho ????
Just RO things. Happy birthday, skipper ©️????#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 @ImRo45 pic.twitter.com/DD75sBhA0Q
— Mumbai Indians (@mipaltan) April 30, 2023
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी देखील हा दिवस महत्वाचा ठरला. रोहित रविवारीच आपला 36 वा वाढदिवस साजरा करत होता. त्याबरोबरच मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू देखील बनण्याचा बहुमान त्याला मिळाला. 190 व्या सामन्यात उतरत त्याने कायरन पोलार्डला मागे सोडले. पोलार्डने मुंबईसाठी 189 सामने खेळले होते. तसेच रोहित मुंबई इंडियन्सचे विक्रमी 150 व्या सामन्यात नेतृत्व देखील करताना दिसला. यापूर्वी केवळ चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने अशी कामगिरी केली आहे. धोनी आयपीएलमध्ये एकाच संघाचे 200 पेक्षा सामन्यात नेतृत्व करणारा एकमेव कर्णधार आहे.
अनेक योगायोग जुळून आले असतानाच रोहित या सामन्यात काहीतरी कमाल करेल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, रोहितला या सामन्यात अपयश आले. पाच चेंडूत 3 धावा करून तो संदीप शर्माच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला.
(IPL 1000 Match Rohit Sharma Becomes Most Capped Mumbai Indians Cricketer And 150 Match As Captain On His Birthday)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेपॉकवर चेन्नई पुन्हा चीत! अखेरच्या चेंडूवर पंजाबने पार केले 201 धावांचे आव्हान
रोहित शर्माला आयपीएलमध्ये हवे होते ‘या’ संघाचे कर्णधारपद, जुन्या सहकारी खेळाडूचा मोठा दावा






