रविवारी (दि. 30 एप्रिल) आयपीएल 2023चा 41 वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स संघात खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने विजयासाठी दिलेले 201 धावांचे आव्हान पंजाब किंग्सने अखेरच्या चेंडूवर 4 गडी राखून पार केले. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
SIKANDAR RAZA wins it for @PunjabKingsIPL ????????
Take a bow!#TATAIPL | #CSKvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
नाणेफेक जिंकून धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे या स्पर्धेतील सर्वात यशस्वी सलामी जोडीने पुन्हा एकदा तशीच भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 9.4 षटकात 86 धावा केल्या. ऋतुराजने 37 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावरील शिवम दुबे याने देखील आक्रमक 28 धावा केल्या. कॉनवेने अखेरपर्यंत नाबाद राहत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम 92 धावांची खेळी केली. धोनीने अखेरच्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकत चेन्नईला 200 धावांपर्यंत पोहोचवले.
या धावांचा पाठलाग करताना पंजाबला शिखर धवन व प्रभसिमरन यांनी चांगली सुरुवात केली. 4.2 षटकात दोघांनी अर्धशतक फलकावर लावले. लियाम लिव्हिंगस्टोन व सॅम करन यांनी मधल्या षटकात आक्रमक फलंदाजी करत आपल्या संघाला सामन्यात कायम ठेवले. जितेश शर्मा याने 10 चेंडूवर 21धावा केल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी 9 धावांची गरज असताना मथिशा पथिरानाने सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. सिकंदर रझाने या चेंडूवर धावून 3 धावा पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
(IPL 2023 Punjab Kings Beat Chennai Super Kings By 4 Wickets Conway Dhoni Livingstone Raza Shines)