मुंबई | इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या उद्घाटन सोहळ्याचा झगमगाट यावेळी नेहमीसारखा चाहत्यांना पहायला मिळणार नाही.
याचे कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासन समितीने उद्घाटन सोहळ्यावर होणाऱ्या अतिरीक्त खर्चावर कात्री लावली आहे.
आयपीएल २०१८चा उद्घाटन समारंभ मुंबईमधील क्रिकेट क्लब ऑफ इंडियावर होणार आहे. हा सोहळा ६ एप्रिल रोजी होणार होता आणि ७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना होणार होता.
परंतु आता ७ एप्रिल मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात वानखेडेवर होणाऱ्या सामन्यापुर्वी आता हा उद्घाटन सोहळा होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला बॉलीवुडच नाही तर हॉलीवुड सितारेही हजेरी लावणार आहेत.
बीसीसीआयमधील काही सुत्रांच्या मते या सोहळ्याला ५० कोटी खर्च होणार होता. परंतु सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासन समितीला हे मंजुर नसल्याने हा सोहळा आता ६ ऐवजी ७ एप्रिल रोजी होणार आहे.
यामुळे वेळ आणि पैसे यांची बचत होणार आहे.