आयपीएल २०२० च्या हंगाम आता शेवटाकडे झुकला असून रविवारी(८ नोव्हेंबर) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात दुसरा क्वालिफायर सामना रंगला. या सामन्यात दिल्लीने १७ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे दिल्ली अंतिम सामन्यात पोहचला आहे. आता मंगळवारी(१० नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात अंतिम सामना रंगणार आहे. रविवारी दिल्लीच्या विजयात शिखर धवन आणि कागिसो रबाडा यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
शिखर धवनची ऑरेंज कॅपवर नजर
शिखर धवनने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ७८ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने या हंगामात ६०० धावांचा टप्पा पार केला आहे. त्याचे आता १६ सामन्यात ६०३ धावा झाल्या आहेत. त्यामुळे आता त्याच्याकडे या हंगामातील ऑरेंज कॅप पटकवण्याची संधी चालून आली आहे.
ऑरेंज कॅप हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. सध्या ही ऑरेंज कॅप किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलकडे आहे. त्याने ६७० धावा केल्या आहेत. पण पंजाबचे आव्हान आधीच संपले असल्याने राहुलच्या धावांमध्ये वाढ होणार नाही. मात्र शिखरला अंतिम सामन्यात ६८ धावा करुन या कॅपचा मानकरी होण्याची संधी आहे.
पर्पल कॅपसाठी रबाडा-बुमराहमध्ये चूरस
जसे आयपीएलच्या प्रत्येक हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. तशीच सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. सध्या ही पर्पल कॅप दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाकडे आहे. रबाडाने रविवारी हैदराबादविरुद्ध ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे ही कॅप सध्या त्याच्याकडे आहे. त्याने आत्तापर्यंत या हंगामात २९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. बुमराहने २७ विकेट्स घेतल्या आहेत.
त्यामुळे आता मंगळवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात पर्पल कॅप मिळवण्यासाठी रबाडा आणि बुमराहमध्ये चूरस पहायला मिळेल.
#क्लालिफायर २ च्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असणारे ५ फलंदाज (आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज) –
१. केएल राहुल- ६७०- धावा, १४ सामने (किंग्स इलेव्हन पंजाब)
२. शिखर धवन – ६०३ धावा, १६ सामने (दिल्ली कॅपिटल्स)
३. डेविड वॉर्नर – ५४८ धावा, १६ सामने (सनरायझर्स हैदराबाद)
४. ईशान किशन – ४८३ धावा, १३ सामने (मुंबई इंडियन्स)
५. क्विंटन डी कॉक – ४८३ धावा, १५ सामने (मुंबई इंडियन्स)
#क्वालिफायर २ सामन्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत असणारे ५ गोलंदाज (आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज) –
१. कागिसो रबाडा- २९ विकेट्स, १६ सामने (दिल्ली कॅपिटल्स)
२. जसप्रीत बुमराह- २७ विकेट्स, १४ सामने (मुंबई इंडियन्स)
३. ट्रेंट बोल्ट – २२ विकेट्स, १४ सामने (मुंबई इंडियन्स)
४. युजवेंद्र चहल – २१ विकेट्स, १५ सामने (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
५. राशिद खान – २० विकेट्स, १६ सामने (सनरायझर्स हैदराबाद)
महत्त्वाच्या बातम्या –
Video – श्रेयस अय्यर विसरला आपल्याच संघातील खेळाडूचे नाव, वॉर्नरने करुन दिली आठवण
….म्हणून मार्कस स्टॉयनिसला सलामीला पाठवले, श्रेयस अय्यरने केला खुलासा
फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी दिल्लीने केली १३ वर्षांची प्रतिक्षा; पाहा अन्य संघांचा काय आहे रेकॉर्ड
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०च्या प्राईझ मनीमध्ये मोठी घट; विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळणार ‘इतके’ रुपये
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत