---Advertisement---

मुलाची संघात निवड न झाल्याने त्यांनी क्रिकेट पाहायचं सोडलं होतं; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला पितृशोक

On: गुरूवार, ऑक्टोबर 22, 2020 10:36 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मनदीप सिंग याच्या वडीलांचे आज (२२ ऑक्टोबर २०२०) निधन झाले आहे. मनदीप सध्या यूएईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र, तो यूएईत असतानाच त्याच्यावर हे संकट कोसळले आहे.

प्रदीर्घ आजाराने निधन…

पंजाबमधील मुळ जालंधर येथील रहिवासी असलेल्या मनदीप सिंग याचे वडील हरदेव सिंग यांचे आज गुरूवारी (२२ ऑक्टोबर) निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. परंतू, आज त्यांची तब्येत खालवल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दुसरीकडे नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

मुलाची संघात निवड न झाल्याने त्यांनी क्रिकेट पाहायचं सोडलं होतं…

हरदेव सिंग यांनी मनदीपला कायम क्रिकेट खेळण्यासाठी पाठींबा दिला होता. जेव्हा मनदीपची भारतीय संघात निवड झाली होती, तेव्हा हरदेव सिंग यांना खूप आनंद झाला होता. २०१६ मध्ये झिंबाब्वे दौऱ्यासाठी मनदीपची भारतीय संघात निवड झाली. त्यापुर्वी त्याची भारतीय संघात निवड न झाल्यामुळे हरदेव सिंग यांनी क्रिकेटचे सामने न पाहाण्याचा निर्णय घेतला होता.

‘जोपर्यंत मुलाची भारतीय संघात निवड होणार नाही, तोपर्यंत सामने पाहाणार नाही’ असेही त्यांनी ठरवले होते. त्यांचा हा प्रण मात्र लवकरच मोडला. कारण त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले होते.

मनदीप सिंग सध्या किंग्ज इलेव्ह पंजाब संघासाठी युएईत असून पुढील सामन्यासाठी दुबईत आला आहे. तो वडीलांच्या अंत्यविधीसाठी भारतात येणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---