---Advertisement---

सुपर ओव्हर राहुद्या, ‘ही’ मुलगी कोण ते सांगा अगोदर…KXIP आणि MI सामन्यानंतर ‘मिस्ट्री गर्ल’ व्हायरल

On: मंगळवार, ऑक्टोबर 20, 2020 4:52 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० चा ३८ वा सामना रविवारी (१८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला. या सामन्यात दोन सपर ओव्हर खेळण्यात आल्या. त्यातील दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान एक ‘मिस्ट्री गर्ल’ (एक मुलगी) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होती. तिच्या फोटोवरील मिम्स शेअर करण्यात आल्या होत्या. त्यावर आता या ‘मिस्ट्री गर्ल’ने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्वत:शी निगडीत मिम्स शेअर केले आहेत.

सर्वांना प्रश्न पडला असेल की, या ‘मिस्ट्री गर्ल’चे नाव काय आहे?, तर या मुलीचे नाव रियाना लालवानी आहे. रियाना दुबईत राहते. या सामन्यानंतर रियानाच्या फॅन फॉलोविंगमध्ये भलतीच वाढ झाली आहे. इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोवर्समध्ये ५०००० हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स झाले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२०चे आयोजन युएईत केले जात आहे. सामन्यांचे आयोजन रिकाम्या स्टेडियम केले जात आहे. सामन्यांमध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जात नाही. परंतु संघाशी निगडीत लोकांनाच खास पासवर प्रवेश मिळत आहे.

पहिल्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई आणि पंजाब संघांनी ५-५ धावा केल्या. त्यानंतर सामन्याचा निकाल काढण्यासाठी दुसरी सुपर खेळावी लागली. सामना खूपच रंगतदार सुरू असताना मोठ्या स्क्रीनवर रियाना लालवानीचा चेहरा एक ते दोन वेळा दाखवण्यात आला. यादरम्यान ती खूपच चिंतेत दिसत होती.

त्यानंतर थोड्याच वेळात सोशल मीडियावर #SuperOver सोबत रियानाचे फोटोही व्हायरल होऊ लागले. त्यामुळेच यादरम्यान रियानाच्या फॅन फॉलोविंगमध्ये वेगाने वाढ होत आहे.

https://www.instagram.com/p/BrVVQfon9H2/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CGhy4BblbZi/?utm_source=ig_web_copy_link

क्रिकेटच्या सामन्यादरम्यान कोणत्याही महिलेचा फोटो व्हायरल होण्याची ही पहिलीच घटना नव्हती. असे यापूर्वीही घडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुंबई वि. पंजाब या ऐतिहासिक सामन्यातील खरा हिरो ‘हा’ एकच; जाणून घ्या कामगिरी

-रोहित, रैना, विराटलाही इतक्या वर्षात जे जमलं नाही ते केएल राहुलने करुन दाखवले

-सुपर ओव्हर पे सुपर ओव्हर! एकाच दिवसात ३ सुपर ओव्हर झाल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पडला पाऊस

ट्रेंडिंग लेख-

-दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…

-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---