---Advertisement---

केकेआरचा ‘तो’ नवा खेळाडू आहे केविन पीटरसनपेक्षाही खतरनाक, यावेळी करणार…

On: मंगळवार, सप्टेंबर 8, 2020 5:55 PM
---Advertisement---

कोलकाता नाइट रायडर्सचा मुख्य मार्गदर्शक डेव्हिड हसीने संघाचा नवीन युवा फलंदाज टॉम बंटनचे कौतुक केले आहे.
त्याने टॉमचे वर्णन केकेआरचा “एक्स फॅक्टर” असे केले आहे. एवढेच नव्हे तर बंटनची तुलना इंग्लंडचा माजी कर्णधार आणि स्टायलिश फलंदाज केव्हिन पीटरसनशी केली आहे.

12 मिनिटांच्या संवाद सत्रात त्याने केकेआरच्या संघाला शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, “या हंगामात टॉम बंटनचा खेळ पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत. याशिवाय जुन्या खेळाडूंवरदेखील जास्त जवाबदारी असेल.”

तो म्हणाला, “ज्या नवीन खेळाडूंना संघात स्थान मिळाले, त्यांच्याविषयी मी खूप उत्सुक आहे. बरेच परदेशी खेळाडू अद्याप आलेले नाहीत परंतु आम्हाला टॉम बंटन खेळताना पहायला आवडेल. बिग बॅश लीगमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली. तथापि, माझ्या मते दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांच्यावर बरेच काही अवलंबून आहे. हे खेळाडू संघाच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवतात आणि तरुण खेळाडूंना प्रचंड मदत करतात.”

पुढे बोलताना म्हणाला, “टॉम बंटन हा एक असा खेळाडू आहे जो केविन पीटरसनची नवीन आवृत्ती आहे किंवा त्याच्यापेक्षाही चांगला आहे असे आपण म्हणू शकतो.”

बिग बॅश लीगमध्ये टॉम बंटनने केली जबरदस्त कामगिरी

ख्रिस लिनसारख्या स्फोटक फलंदाजाला सोडल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने या आयपीएल हंगामाच्या लिलावात टॉम बंटनला त्यांच्या संघात समाविष्ट केले. तो एक जबरदस्त स्फोटक सलामीवीर आहे. त्याने बिग बॅश लीगच्या हंगामात बऱ्याच धावा केल्या आणि विस्फोटक डाव खेळले. केकेआरकडून तो सलामीला येऊन बऱ्याच धावा करू शकतो. तो सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका खेळत आहे आणि त्यानंतर आयपीएल खेळण्यासाठी दुबई येथे येईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---