मुंबई । दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू जॉन्टी रोड्स सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) किंग्ज इलेव्हन पंजाबचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. त्यामुळे तो संघातील खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणाचा सराव करुन घेताना दिसून आला आहे. या दरम्यान, सराव सत्रात 51 वर्षांच्या अनुभवी ऱ्होड्सने हवेत सूर मारत सुरेख झेल पकडला आणि अनेकांना चकित केले.
ऱ्होड्सच्या क्षेत्ररक्षणाचा हा व्हिडीओ फ्रेंचायझीने ट्विटरवर शेअर केला आहे. त्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘तुम्ही असा झेल पकडला आहे का?’ यावर भाष्य करताना अनेक युजर्सनी त्याचे कौतुक केले.
https://twitter.com/lionsdenkxip/status/1305348042522943488
पंजाब संघाला आतापर्यंत जेतेपद मिळवता आले नाही
यावेळी कोरोनामुळे आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा पहिला सामना 20 सप्टेंबरला दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. संघ अद्याप अजिंक्यपद जिंकू शकलेला नाही. 2014 मध्ये हा संघ एकदा अंतिम सामना खेळला होता.
ऱ्होड्सने केल्या 245 वनडे सामन्यात 5935 धावा
जॉन्टी ऱ्होड्स क्रिकेट जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. त्याने 52 कसोटी सामन्यांमध्ये 2532 आणि 245 वनडे सामन्यात 5935 धावा केल्या आहेत. 2003 च्या विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.






