काल झालेल्या पुणे वी. कोलकाता सामन्यात सर्वांचा लक्ष वेधून घेणारा एक खेळाडू म्हणजे पुण्याचा राहुल त्रिपाठी. डेक्कन जिमखाना आणि महाराष्ट्राकडून खेळणारा हा खेळाडू या मोसमात सर्वात जास्त लयीत आहे म्हणले तर वावगे ठरणार नाही.
पुण्याकडून खेळलेल्या ९ सामन्यांपैकी ७ सामन्यांमध्ये ३० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. काल झालेल्या सामन्यात राहुलने ७८ चेंडूत ९३ धावांची खेळी केली आणि पुण्याचा विजय देखील जवळ पास निश्चित केला. त्याने ७ षटकार मारत सर्वात जास्त षटकारांचा किताब देखील मिळवला आणि सामनावीर देखील तोच ठरला.
मी माझा नेहमीचा खेळ खेळत होतो. वेगळं काही करायला गेलो नाही. त्यांचे गोलंदाज अप्रतिम आहेत म्हणूनच मी माझ्या पद्धतीने खेळात गेलो आणि जसे चेंडू येत होते तसे फटके मारत होतो.
स्ट्रॅटेजिक टाईम-आऊट मध्ये देखील कर्णधार स्मिथ आणि प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी मला सांगितले की आपली विकेट न गमावता खेळत रहा, मी तेच केले. इतक्या मोठ्या प्रमाणाच्या गर्दीसमोर मी खेळलो नाहीए म्हणून जरा दडपण होते पण माझ्या संघातल्या सर्वांनी मनोबळ वाढवले आणि आपल्या खेळावर आणि मेहनतीवर विश्वास ठेऊन खेळ असे सांगितले.