२०१७ आयपीएलमध्ये काही चुरशीचे सामने झाले तर काही एकहाती सामने झाले तर काही सामने अगदी सुपर ओव्हर पर्यंत गेले. काही सामन्यांमध्ये अत्यंत सुमार फलंदाजी बघायला मिळाली तर काही सामन्यांमध्ये उत्कृष्ट फटकेबाजी. लीग सामन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ठरले नव्हते की कुठेले चार संघ पुढे जाणार. यावरूनच समजून येते कि या वर्षीचे आयपीएल किती धमाकेदार झाले आहे.
अशा या आयपीएल २०१७ मधील काही मनोरंजक आकडेवारी
१. सर्वांत कमी धावांनी विजय १
२. एकही विकेट न गमावता लक्ष पार केले २ वेळा
३. ५ विकेट्स घेणारे गोलंदाज ३
४. एकाच दिवशी २ गोलंदाजांनी वेगळ्या वेगळ्या सामन्यांमध्ये घेतील हॅट्रिक , एकूण या वर्षी ३ हॅट्रिक्स.
५. या मसोमात ४ फलंदाजांनी ५ शतके ठोकली,
हाशिम आमला(२)
संजू सॅम्सन, डेविड वॉर्नर ; बेन स्टोक्स प्रत्येकी एक .
६. २०१७मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी अँड्रेव ट्राययाने केली ५/१७ , ही कामगिरी त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच करून दाखवली.
७. मुंबई इंडियन्स या वर्षी १२ सामने जिंकले आहेत जो आता पर्यंतच्या आयपीएलमधील एका मोसमातील दुसरा सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आहे. या आधी २००८ राजस्थान रॉयल्सने १३ सामने पहिल्याच मोसमात जिंकले होते.
८. पोलार्डने या मोसमात १५ झेल घेतले जो कि आजपर्यंत एका मोसमात सर्वाधिक झेल घेण्याच्या यादीत दुसरा विक्रम आहे. मागील मोसमात ए बी डेव्हिलर्सने १९ झेल घेऊन हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
९.उथप्पाने या वर्षी यष्टीरक्षक म्हणून १५ बळी घेतले ज्यात ९ झेल आणि ६ स्टंपिंगचा हि समावेश आहे.
१०. भुवनेश्वर कुमारने या वर्षी २६ विकेट्स घेतले. आतापर्यंत कोणत्याच गोलंदाजाला एवढया विकेट्स घेणे शक्य झाले नाही.
११. मॅक्सवेल आणि वॉर्नर यांनी या वर्षी प्रत्येकी २६ षटकार मारले.
१२. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कोलकाताविरुद्ध ४९ धावांत गारद झाले होते, ही आयपीएलमधील नीचांकी धावसंख्या आहे.
१३. वॉर्नरने या वर्षीचा सर्वाधिक स्कोर म्हणजेच १२६ धावा केल्या हा आतापर्यंतच्या सर्वाधिक धावांच्या यादीत सातव्या क्रमांकाचा स्कोर होता.
१४. मुंबई इंडियन्सने १४६ धावांनी दिल्ली डेरडेव्हिल्स पराभव केला. हा आता पर्यंतच्या आयपीएलमधील सर्वात जास्त धावसंख्येने हरवण्याचा विक्रम होता.
१५. क्रिस लिन आणि गंभीर यांनी आतापर्यंतच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावांची सलामी केकेआरसाठी दिली. त्यानी गुजरात विरुद्ध १८४ धावा करत सामना जिंकला.
१६. पंजाबने मुंबईविरुद्ध २३० धावांचा डोंगरकेला. मोसमातील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्यामुळे पंजाबच्या नावावर आहे.
१७. जेथे बाकी फलंदाजांना ५०० धावा करता आल्या नाही तेथे वॉर्नरने ६४१ धाव केल्या. या वर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वॉर्नरच्या नावावर आहे.
१८. या वर्षी ७०५ षटकार मारण्यात आले ज्यातील ११७ षटकार मुंबईने मारले आहेत.