आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स असे दोन सामने रंगणार आहेत.
आयपीएल प्ले-आॅफच्या दृष्टीने या दोन्ही सामन्यांना महत्त्व आहे. कारण आजच्या सामन्यांच्या निर्णयावरून प्ले-आॅफची पुढची समीकरणे तयार होणार आहेत.
सध्या चेन्नई आणि हैद्राबादने प्ले-आॅफमधील जागा पक्की केली आहे. त्यामुळे बाकी संघ आणखी तिसऱ्या आणि चौथ्या जागेसाठी लढत आहेत.
आज पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये होणार आहे. या दोन्ही संघांचे गुण 13 सामन्यात 12 आहेत.
त्यामुळे या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो आयपीएल प्ले-आॅफसाठी प्रबळ दावेदार ठरेल पण त्याच बरोेबर त्यांना बाकी सामन्यांच्या निर्णयांवर देखील अवलंबून रहावे लागणार आहे.
तसेच या दोन्ही संघाचा नेट रनरेटही प्लेआॅफच्या समीकरणात महत्त्वाची भूमीका बजावणार आहे.
जर बेंगलोरने आज विजय मिळवला तर त्यांना त्यांच्या पॉझिटिव्ह नेट रनरेटचा फायदा होऊ शकतो.
याबरोबरच आज आयपीएलचा दुसरा सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स असा होणार आहे.
प्लेआॅफमध्ये स्थान पक्क करण्यासाठी कोलकताला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. सध्या कोलकताचे 13 सामन्यात मिळुन 14 गुण आहेत.
त्यामुळे जर आज कोलकताने हैद्राबादला पराभूत केले तर त्यांचे 16 गुण होतील आणि ते थेट प्ले आॅफला पात्र ठरतील.
पण जर कोलकताला आज हैद्राबादविरुद्ध पराभूत व्हावे लागले तर त्यांना नेट रनरेटवर आणि बाकी सामन्यांच्या निर्णयांवर अवलंबून रहावे लागेल. कारण एक किंवा त्यापेक्षा अधिक संघाचेही गुण 14 होण्याची शक्यता आहे.
आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामना दुपारी 4 वाजता आणि सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स सामना रात्री 8 वाजता सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–या दोन संघांना आयपीएलमध्ये पडले आहेत षटकारांचे सर्वाधिक फटके
–मुंबई नाही तर या दोन संघांनी आयपीएलमध्ये केली आहे षटकारांची बरसात
–धोनी-कोहलीबद्दल झाला आयपीएलमध्ये विलक्षण योगायोग…!!!
–थोडं उशीरा, पण धोनीने केला हा भीमपराक्रम आपल्या नावे!
–त्या फलंदाजाची आयपीएलमधील एक धाव पडली ७ लाख रुपयांना