मुंबई। आज आयपीएल 2018 च्या क्वालिफायर 1 चा सामना गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर असणाऱ्या सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात होत आहे. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.
त्यामुळे या सामन्यासाठी हैद्राबादचा माजी कर्णधार डेविड वॉर्नरने संघाला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की “सनरायझर्स हैद्राबाद आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा. असेच चांगले खेळत रहा. केन विलियमसन अफलातून खेळत आहे. तसेच त्याने चांगले नेतृत्व केले आहे.”
Good luck to @SunRisers tonight, keep playing well gentlemen. Been simply outstanding and being well lead by The great man himself Kane 👍👍
— David Warner (@davidwarner31) May 22, 2018
मार्च महिन्यात झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणामुळे वॉर्नरवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच आयपीएल खेळण्यावरही 1 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्याला हैद्राबादचे कर्णधारपदही सोडावे लागले. हैद्राबादने त्याच्या ऐवजी कर्णधारपदाची धूरा विलियमसनच्या हातात सोपवली.
वॉर्नरने 2015 ते 2017 असे 3 आयपीएल मोसमात हैद्राबादचे नेतृत्व केले. त्यातील 2016 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैद्राबाद विजेतेपद पटकावले. तर 2017 मध्येही हैद्राबाद संघाने त्याच्या कर्णधारपदाखाली प्ले-आॅफमध्ये प्रवेश केला होता.
वॉर्नरने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 114 सामन्यात 40.54च्या सरासरीने 4014 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 10 खेळांडूमध्ये आहे. तसेच आयपीएलमध्ये 4000 धावांचा टप्पा पार करणारा तो एकमेव परदेशी खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–हरमनप्रीत कौरच्या सुपरनोवासचा ऐतिहासिक महिला आयपीएल सामन्यात विजय
–धोनी-रैना: ये जोडी हैं नंबर १
–IPL 2018: आयपीएलच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी खुशखबर
–Video: सुपरवुमन हरमनप्रीत कौरने घेतला एबी डेविलियर्सपेक्षाही भारी कॅच
–रैनाने आज तुफानी खेळी केली तर या विक्रमासाठी विराटला वर्षभर वाट पहावी लागणार!
-शिखर धवनला हा विक्रम करत धोनीला मागे टाकण्याची संधी
–वाचा- वेळा बदलल्या आहेत मग आजचा सामना नक्की आहे तरी किती वाजता?