-अनिल भोईर
आयपील २०१८ अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. साखळीतील २ सामने शिल्लक असून प्लेऑफच पूर्ण चित्र स्पष्ट नाही. हैदराबाद व चेन्नई या दोन संघांनी प्लेऑफ मध्ये आधीच प्रवेश केला आहे. तर काल कोलकताने हैदराबादला पराभूत करून प्लेऑफ मध्ये प्रवेश मिळवला.
प्लेऑफच्या उर्वरित १ जागेसाठी अजून ३ संघ प्रतीक्षेत आहेत. हैदराबाद व चेन्नई दोन संघ १८ व १६ गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काल झालेल्या कोलकता विरुद्ध हैदराबाद सामना कोलकताने जिंकत प्लेऑफ मध्ये प्रवेश मिळवला आहे. १६ गुणांसह कोलकता तिसऱ्या स्थानी आहे.
वानखेडे, मुंबई येथे २२ मे ला होणाऱ्या आयपील २०१८ चा पहिला क्वॉलिफायर सामन्यात हैदराबाद विरुद्ध कोण खेळणार चेन्नई की कोलकता अजून स्पष्ट नाही.तर ईडन गार्डनवर २३ मे ला होणाऱ्या प्लेऑफच्या एलिमिनेटर सामन्यात कोणते दोन संघ खेळणार? आज होणाऱ्या साखळीतील शेवटच्या दोन सामन्यानंतर प्लेऑफच चित्र स्पष्ट होईल.
आयपील २०१८ च्या आज होणाऱ्या शेवटच्या दोन साखळी सामन्याच्या निकाल नंतर काय असतील सूत्र:
-मुंबई संघ असा होईल पात्र:
दिल्ली विरुद्ध सामना जिंकला तर मुंबई होणार प्लेऑफसाठी पात्र. १४ गुणांसह मुंबई चौथ्या स्थानावर राहील.
-पंजाब संघ असा होऊल पात्र:
पंजाबला प्लेऑफमध्ये प्रेवश मिळवण्यासाठी दिल्लीने मुंबईला पराभूत करणे आवश्यक आहे. तसेच चेन्नई विरुद्ध ५३ धावांनी किंवा ३८ चेंडू राखून विजय मिळवणे आवश्यक आहे, अस झाल्यास पंजाब १४ गुणांसह चौथ्या स्थानावर राहील.
–राजस्थान संघ असा होईल पात्र:
राजस्थानला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिल्लीने मुंबईला पराभूत करणे आवश्यक आहे. तसेच पंजाब विरुद्ध चेन्नई सामन्यात चेन्नईचा विजय किंवा चेन्नई ५३ धावांनी किंवा ३८ चेंडू राखून अश्या फरकाने पराभूत होऊ नये. अस झाल्यास राजस्थान १४ गुणांसह चौथ्या स्थानांवर राहील.
-दुसऱ्या स्थानसाठी अशी आहेत सूत्र:
कालच्या सामन्यानंतर चेन्नई १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे तर कोलकाता १६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. पण पंजाब विरुद्ध चेन्नई हा सामना पंजाबने ७६ धावांनी किंवा ५० चेंडू राखून जिंकला तर चेन्नई तिसऱ्या स्थानवर आणि कोलकता नेट रनरेटच्या आधारावर दुसऱ्या स्थानावर जाऊ शकते.
असे असतील प्लेऑफच्या सामन्याच्या शक्यता:
पहिला क्वॉलिफायर सामना (२२ मे वानखेडे, मुंबई)
हैदराबाद विरुद्ध चेन्नई / कोलकता
एलिमिनेटर सामना (२३ मे ईडन गार्डन, कोलकता)
कोलकता / चेन्नई विरुद्ध मुंबई / पंजाब / राजस्थान