बंगळूरू। आयपीएलमध्ये आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध दिल्ली डेअरडेविल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षीच्या मोसमात दोन्ही संघानी चार सामने खेळले असुन तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभूत व्हावे लागले आहे.यामुळे हे दोन्ही संघ 2 गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहेत.
बेंगलोरसाठी फलंदाजीत विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स अशी बाजू जमेची आहे.पण शेवटच्या षटकातील गोलंदाजी चिंतेचा विषय बनली आहे.
दिल्लीकडून ग्लेन मॅक्सवेल, रिषभ पंत, गौतम गंभीर, श्रेयस अय्यर याच्यावर फलंदाजीची तर राहूल टेवातिया, ख्रिस मॉरीस याच्यावर गोलंदाजीची जबाबदरी असेल.
आज या दोन्ही संघात प्रत्येकी एक बदल करण्यात आला आहे. बेंगलोर संघात सर्फराज खान ऐवजी मनन वोहराला आणि दिल्ली संघात मोहम्मद शमी ऐवजी हर्षल पटेलला 11 जणांच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
असे आहेत 11 जणांचे संघ:
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर:विराट कोहली (कर्णधार ), एबी डिव्हिलियर्स, ख्रिस वोक्स, क्विंटॉन डी कॉक, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मंदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, कोरे अॅण्डरसन, मनन वोहरा.
दिल्ली डेअरडेविल्स:गौतम गंभीर (कर्णधार), रिषभ पंत, श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल, शहाबाज नदीम, विजय शंकर, ट्रेंट बोल्ट, जेसन रॉय, ख्रिस मॉरीस, राहूल टेवातिया, हर्षल पटेल.