जयपूर। आयपीएलमधील आजचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद असा होणार आहे. या सामन्यात हैद्राबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज हैद्राबादच्या 11 जणांच्या संघात एकच बदल करण्यात आला आहे. मोहम्मद नबीच्या ऐवजी अॅलेक्स हेल्सला संधी देण्यात आली आहे.
तसेच राजस्थानच्या 11 जणांच्या संघात ईश सोधी आणि महिपाल लोमरोर या दोघांना आज संधी मिळाली आहे. हे दोन बदल राजस्थानच्या संघात झाले आहेत.
अॅलेक्स हेल्स, ईश सोधी आणि महिपाल लोमरोर हे तिघेही आजच्या या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहेत.
राजस्थान 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज मैदानात उतरणार आहे. या संघाने या मोसमात आत्तापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 3 सामन्यांत विजय नोदंवला आहे तर 3 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
तसेच हैद्राबादने 7 सामन्यांपैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर 2 सामन्यांत पराभव स्विकारला आहे.
याआधी या मोसमात हे दोन संघ 9 एप्रिलला हैद्राबाद येथे आमने-सामने आले होते. त्या सामन्यात हैद्राबादने राजस्थानला 9 विकेट्सने पराभूत केले होते.
असे आहेत 11 जणांचे संघ:
सनरायजर्स हैद्राबाद: केन विल्यमसन ( कर्णधार ), शिखर धवन, वृद्धीमान साहा, मनिष पांडे, शाकिब अल हसन, युसुफ पठाण, राशिद खान, सिध्दार्थ कौल,बसिल थम्पी, अलेक्स हेल्स, संदिप शर्मा,
राजस्थान रॉयल्स: अजिंक्य राहणे (कर्णधार), बेन स्टोक्स, संजू सॅमसन, जॉस बटलर, राहुल त्रिपाठी, जोफ्रा आर्चर, कृष्णप्पा गॉथम, धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट, श्रेयश गोपाळ, महिपाल लोमरोर.
महत्त्वाच्या बातम्या –
–ऑस्ट्रेलियाच्या या शहरातून मिळाले ३ विश्वचषक विजेते खेळाडू
–IPL 2018: आज राजस्थान-हैद्राबाद आमने-सामने
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४- दैव देते, कर्म नेते!!
–‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीने केला हा खास विक्रम
–नव्या कर्णधाराने टोलावलेला चेंडू पडला माजी कर्णधाराच्या समोर, पुढे काय घडले पहाच






