मुंबई । आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांचा सामना आहे. या दोन्ही संघानी आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्स हे तीनही सामने हरल्याने गुणतालिकेत सगळ्यात खाली आहे. बेंगलोरचा संघही तीन पैकी दोन सामने हरला आहे.
आज होणाऱ्या या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला एक खास विक्रम करण्याची संधी आहे. विराटला बेंगलोरकडून टी२०मध्ये ५००० धावा करण्यासाठी केवळ ४९ धावांची गरज आहे.
जर त्याने ४९ धावा केल्या तर आयपीएलमधील एकाच संघाकडून अशी कामगिरी तो पहिला खेळाडू ठरणार आहे. सुरेश रैनाने चॅम्पियन्स लीग आणि आयपीएल मिळून ५४०० धावा केल्या आहेत. परंतू त्यासाठी तो दोन वेगवेगळ्या संघांकडून खेळला आहे.
त्याने आजपर्यंत बेंगलोरकडून आयपीएलमध्ये १५२ सामन्यात ४५२७ धावा केल्या आहेत तर याच संघाकडून चॅम्पियन्स लीगमध्ये १५ सामन्यात खेळताना १४ डावात ३८च्या सरासरीने ४२४ धावा केल्या आहेत. त्यामूळे त्याच्या बेंगलोरकडून टी२०मध्ये १६७ सामन्यात ४९५१ धावा झाल्या आहेत.
चॅम्पियन्स लीगमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये सुरेश रैना (८४२), मुरली विजय (४९७), एमएस धोनी (४४९) आणि विराट कोहली(४२४) हे सर्वोच्च धावा करणारे खेळाडू आहेत.
आयपीएलमध्येही विराटला सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होण्यासाठी केवळ ३१ धावांची गरज आहे. सुरेश रैना या यादीत अव्वल असून त्याने १६३ सामन्यात ४५५८ धावा केल्या आहेत तर विराटने १५२ सामन्यात ४५२७ धावा केल्या