मुंबई। आयपीएल 2018 चा मोसम शेवटच्या टप्यात आलेला आसतानाच आयपीएलच्या मराठी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
27 मेला आयपीएल 2018चा आंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. विशेष म्हणजे हा सामना स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर मराठी समालोचनासह दाखवण्यात येणार आहे.
संदीप पाटील, सुनंदन लेले आणि चंद्रकांत पंडीत हे या सामन्यासाठी मराठी समलोचन करतील. यामुळे आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच मराठीत समालोचन होणार आहे.
या सामन्याआधी संध्याकाळी 6 वाजल्यापासून एक खास कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता स्वप्नील जोशी सहभागी होणार आहे.
यावर्षी पहिल्यांदाच हिंदी आणि इंग्लिश समालोचनाव्यतिरिक्त बंगाली, कन्नडा, तेलगू आणि तमीळ भाषेतही आयपीएलचे पहिल्या सामन्यापासून समालोचन होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–Video: सुपरवुमन हरमनप्रीत कौरने घेतला एबी डेविलियर्सपेक्षाही भारी कॅच
–रैनाने आज तुफानी खेळी केली तर या विक्रमासाठी विराटला वर्षभर वाट पहावी लागणार!
-शिखर धवनला हा विक्रम करत धोनीला मागे टाकण्याची संधी
–वाचा- वेळा बदलल्या आहेत मग आजचा सामना नक्की आहे तरी किती वाजता?
–जर आजचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज पराभूत झाले तर….
–जर्सी भारताची असो की चेन्नईची, धोनी विक्रम करताना काही थांबेना!