---Advertisement---

तर आजचा कोलकाता-राजस्थान सामना होणारच नाही!

On: बुधवार, मे 23, 2018 4:38 PM
---Advertisement---

कोलकाता | आजचा कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान राॅयल्स यांच्यातील सामना रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आज कोलकातामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. त्यामुळे हा सामना जर वाया गेला तर साखळी सामन्यातील कामगिरीवर संघाला पुढच्या फेरीत संधी देण्यात येईल. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थानपेक्षा अधिक सामने जिंकल्यामुळे ते क्वाॅलिपायर्स २ला पात्र ठरलतील.

आज सकाळी वेधशाळेने येथे दुपारनंतर ५१% पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे हा सामना वाया जाण्याची शक्यताच वर्तवली जात आहे.

या सामन्यात बऱ्याच गोष्टी कोलकाताच्या बाजूने जुळून आल्या आहेत. घरचे मैदान, तसेच हा संघ राजस्थानपेक्षा बराच वरचढ सध्या वाटत आहे. त्यात आज पाऊस पडला तर निकाल त्यांच्याच बाजूने जाणार आहे.

दुसऱ्या बाजूला जाॅश बटलर आणि बेन स्टोक्ससारखे दिग्गज खेळाडू राजस्थानमधून आता मायदेशी परतले आहे. त्यात सर्व समीकरणांची सांगड घालत रहाणेचा हा संघ कसाबसा प्ले-आॅफला पोहचला आहे. त्यामुळे आता जर राजस्थान संघाला पावसामुळे क्वाॅलिपायर्स २ मुकावे लागले तर राजस्थानच्या चाहत्यांची नक्कीच मोठी निराशा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनी आणि रैनाच आहेत ट्वेंटी20 चे सुपर किंग

मग गौतम गंभीचा गेम केला तरी कुणी?

-१९ पैकी चेन्नईच्या ८ खेळाडूंना आयपीएलमध्ये मिळाला सामनावीर पुरस्कार

धोनी धोनी हैं ! हा फोटो सांगतो, धोनी का स्पेशल आहे?

चेन्नई आणि वानखेडेचं खास नातं, जुळून आला खास योगायोग

एकदा नाही तर तब्बल ११ आयपीएल रैना ठरला विराटला सरस!

एकदा १०० तर दुसऱ्यांदा ०, या खेळाडूबरोबर आयपीएलमध्ये झाला गजब विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment