चेन्नई। आजपासून आयपीएलचा 12 वा मोसम रंगणार आहे. या मोसमाची सुरुवात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) होणार आहे.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी चेन्नई संघाने शेन वॉटसन, इम्रान ताहीर आणि ड्वेन ब्रावो या परदेशी खेळाडूंना संधी दिली असून बेंगलोरने एबी डिविलियर्स, शिमरॉन हेटमेयर, मोईन अली आणि कॉलीन डी ग्रँडहोम या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे.
नाणेफेकीवेळी विराटने सांगितले की बेंगलोरकडून तो आणि पार्थिव पटेल सलामीला फलंदाजी करणार आहेत. तसेच मोईन अली किंवा डिविलियर्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतील.
त्याचबरोबर बेंगलोरने शिवम दुबे आणि नवदिप सैनी या युवा क्रिकेटपटूंना संधी दिली आहे. त्यामुळे बेंगलोरकडून हेटमेयर, नवदीप आणि शिवम हे तिघे आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहेत.
आत्तापर्यंत चेन्नई आणि बेंगलोर संघात एकूण 22 सामने झाले असून यातील 14 सामने चेन्नईने जिंकले आहेत, तर 7 सामने बेंगलोरने जिंकले आहेत. त्याचबरोबर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
या सामन्यासाठी असे आहेत 11 जणांचे संघ –
चेन्नई सुपर किंग्ज – शेन वॉटसन, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, हरभजन सिंग, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, इम्रान ताहीर.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली, पार्थिव पटेल, एबी डिव्हिलियर्स, मोईन अली, शिमरॉन हेटमेयर, शिवम दुबे, कॉलिन डी ग्रँडहोम, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.
महत्त्वाच्या बातम्या-
–कोहलीच्या या गोष्टीची रिषभ पंतला वाटते सर्वात जास्त भीती
–सीएसकेच्या प्रशिक्षकांचा कोहलीला पाठिंबा, टीका करणाऱ्या गंभीरला दिले उत्तर
–आयपीएल सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्ससाठी ही आहे निराशाजनक बातमी…