मुंबई । सध्या भारतात आयपीएल २०१८चे जोरदार वारे वाहत आहे. देशाच्या विविध भागात हे सामने होत असल्यामुळे संपुर्ण देश ढवळून निघाला आहे. असे असले तरीही २०१९ची आयपीएल भारतात होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
कारण या काळात भारतात लोकसभा २०१९च्या निवडणूका होणार आहेत.
यापुर्वीही दोन वेळा लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलचे सामने दुसऱ्या देशात खेळवले गेले आहेत.
२००९मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे सामने झाले होते तर २०१४ला पहिले दोन आठवडे संयक्त अरब अमिरातीमध्ये झाले होते.
२०१९मध्येही हे सामने संयक्त अरब अमिरातीमध्ये होण्याची शक्यता आहे.
पुढच्या वर्षीचे सामने हे २९ मार्च ते १९ मे या काळात होणार आहे. तर त्यानंतर भारतीय संघ लगेच इंग्लडला विश्वचषकासाठी रवाना होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेपेक्षा संयक्त अरब अमिरातीची वेळ ही भारतीयांसाठी योग्य ठरते. तसेच यामुळे ते सामने पाहू शकतात असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
बीसीसीआय यासाठी निवडणुक आयोगाच्या २०१९च्या निवडणूकाच्या तारखा घोषीत होण्याची वाट पहाणार आहे. या तारखा घोषीत झाल्या की लगेच याबद्दल निर्णय घेणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–आयपीएलमध्ये पहिल्यांदाच जुळून आला असा योगायोग
–भारतीय संघातील या दोन मित्रांचं मराठीतील संभाषण नक्की पहा
–कसोटी क्रिकेट चाहत्यांसाठी हे आहे नाराज करणारे वृत्त
– सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने
–टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच
–सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने
–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली