आयपीएलचा 12 मोसम या महिन्यात सुरु होणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. त्यातच दिल्ली कॅपिटल्स पाठोपाठ आता मुंबई इंडियन्सने काही दिवसांपूर्वी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे.
मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी ही नवीन जर्सी घातलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुंबई इंडियन्सची जर्सी निळ्या आणि सोनेरी रंग छटांमध्ये आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना मुंबई इंडियन्सने ट्विट केले आहे की, ‘नवीन मोसम, नवीन आवतार’
New season, new avatar👌🏻
Watch @ImRo45, @Jaspritbumrah93, @hardikpandya7 and @krunalpandya24 in the all-new MI kit today 👕🧢💙
👀: MITV
⏱: 1.00 PM
📺: @StarSportsIndia 1 Hindi and SS 1 HD Hindi#CricketMeriJaan pic.twitter.com/iPD5O0htyB— Mumbai Indians (@mipaltan) February 24, 2019
तसेच या नवीन जर्सीचा दुसरा व्हिडिओही मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे. या व्हिडिओबरोबरच ट्विट केले आहे की, ‘निळ्या आणि सोनेरी रंगातील वारसा कायम चमकत आहे!’
The Blue and Gold legacy continues to shine 💙✨
Paltan, here's the official MI kit for #VIVOIPL 2019 😍#CricketMeriJaan pic.twitter.com/ob4Syhq29X
— Mumbai Indians (@mipaltan) February 24, 2019
मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत 2013, 2015 आणि 2017 असे तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. मात्र मागील मोसमात त्यांना बाद फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले होते.
23 मार्चपासून सुरु होणाऱ्या यावर्षीच्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध 24 मार्चला होणार आहे. यावर्षी मुंबईच्या संघात युवराज सिंग या स्टार अष्टपैलू खेळाडूचा समावेश झाला आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
असा आहे 2019 च्या आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सचा संघ-
रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंडे, राहुल चहर, अनुकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डीकॉक, एव्हिन लेविस, किरॉन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मॅक्लेनाघन, ऍडम मिलने, जेसन बेरेन्डॉन्फ, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंग, बरिंदर स्त्रान, पंकज जयस्वाल, रसीख सलाम , युवराज सिंग,जयंत यादव.
महत्त्वाच्या बातम्या-
–टॉप १०: पहिल्या वनडेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी केले हे खास विक्रम
–९९ धावांवर ४ विकेट असतानाही कोहली शास्त्रींना का म्हणाला ‘ही चांगली गोष्ट आहे’, वाचा
–एमएस धोनीचा नवीन कारनामा, आता हा विश्वविक्रमही झाला नावावर