आयपीएल 2019 साठीचा लिलाव जयपूर, राजस्थान येथे 18 डिसेंबरला पार पडला. या लिलावात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक दाखवलेल्या युवा खेळाडूंना सर्वच संघांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली.
आयपीएलचा हा 12वा हंगाम आहे. यावेळी या स्पर्धेचे अध्यक्षपद हे रिकामेच राहणार आहे. असे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच होणार आहे. तसेच यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या समितीने (सीओए) संघनिवड आणि सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या सल्लागार समिती यांना वगळता बाकी समित्यांना नकार दिला आहे.
सध्यातरी आयपीएलच्या अध्यक्षपदासाठी कोणाचीच निवड करण्यात आली नसून वार्षिक निवडणुकीनंतर आयपीएलचे अध्यक्ष ठरवले जाणार आहे असे बीसीसीआयच्या कार्यकारी अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.
“निवडणुकीनंतर आयपीएलचे अध्यक्ष ठरवले जाणार आहे. तोपर्यत सीओए आणि आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्षांचे काम बघणार आहे”, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले.
“आयपीएलचे सामने आणि भारतीमधील सार्वजनिक निवडणुकांच्या तारखा जवळपास एकच असण्याची शक्यता आहे. यामुळे आयपीएल भारताबाहेर होऊ शकते. तसेच यासाठी अध्यक्षांचे असणे जरूरी आहे”, असेही बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
–एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात मोठी खुशखबर
–ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी अशी आहे १६ खेळाडूंची टीम इंडिया
–रणजी गाजविणाऱ्या दिग्गज गोलंदाजाला आयपीएल लिलावात ठेंगा