किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सलग पराभवांची मालिका अजूनही सुरू आहे. पंजाबला ७ सामन्यांमध्ये ६ सामन्यात पराभवाची धूळ चाखावी लागली. पंजाब संघात अनिल कुंबळे, जॉन्टी रोड्स, वसीम जाफर आणि अँडी फ्लॉवरसारखे दिग्गज प्रशिक्षक आहेत, असे असूनही, संघाच्या रणनीतीवर बरेच प्रश्न उपस्थित झाले.
किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमध्ये आर्धा हंगाम पूर्ण केला आहे, तरी परिपक्व असा अंतिम अकराचा संघ मैदानात उतरवण्यात संघव्यवस्थापनेला यश आलेले नाही. संघात असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आतापर्यंतच्या कामगिरीने निराश केले आहे.
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला ते ३ खेळाडू कोण आहेत ते सांगणार आहोत. ज्यांना किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढावे. संघात त्या खेळाडूंच्या जागी अन्य खेळाडूंना संधी द्यावी. चला ते ३ खेळाडू कोण आहेत ते जाणून घेऊया.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने संघातून वगळावे असे ३ खेळाडू
३. क्रिस जॉर्डन
ख्रिस जॉर्डन किंग्ज इलेव्हन पंजाबकडून अद्याप पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. आतापर्यंत त्याला ३ सामन्यांत संधी मिळाली आहे. यात तो बळी घेण्यास अपयशी ठरला आहे. ख्रिस जॉर्डन हा इंग्लंडच्या टी-२० संघाचा नियमित खेळाडू आहे आणि डेथ ओव्हर्समध्ये जबरदस्त गोलंदाजी करतो पण पंजाबसाठी तो असे करण्यात अपयशी ठरला आहे.
ख्रिस जॉर्डनच्या जागी अंतिम अकारामध्ये हार्डस विल्जोएनला संधी दिली जाऊ शकते. ज्याने या हंगामात अद्याप एकही सामना खेळलेला नाही.
२. प्रभसिमरन सिंग
मागील आयपीएल हंगामात प्रभसिमरन सिंगला किंग्ज इलेव्हन पंजाबने मोठ्या रकमेवर खरेदी केले होते. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याचे लांब षटकार पाहून त्याचा संघात समावेश केला गेला, परंतु आतापर्यंत मिळालेल्या सर्व संधींमध्ये तो छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे.
आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत प्रभसिमरनला २ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. पण त्याला काही खास करता आले नाही. प्रभसिमरन सिंग याच्या जागी एकही सामन्यात संधी न मिळालेल्या दीपक हूडा याला संधी देण्यात येऊ शकते. हुडा याच्यात वेगवान डाव खेळण्याची क्षमता असून मधल्या फळीत हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
१. ग्लेन मॅक्सवेल
किंग्ज इलेव्हन पंजाबचा हुकमी खेळाडू समाजाला जाणारा ग्लेन मॅक्सवेल या हंगामातील आतापर्यंतच्या सामन्यांत प्लॉप ठरला आहे. आतापर्यंत त्याला ७ सामन्यात १, ५, १३, ११, ११, ७ आणि १० अशा धावा करता आल्या आहेत. म्हणजेच त्याने आतापर्यंत एकूण ७ डावांमध्ये ५७ धावा केल्या आहेत. या हंगामात त्याचे योगदान चिंताजनक आहे.
त्यामुळे ग्लेन मॅक्सवेलला आता संघातून वगळले जावे आणि आता त्याची जागी ख्रिस गेलला संधी द्यावी, जो अद्याप एकाही सामन्यात खेळू शकलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: सुपर सिक्स! धोनीने नटराजनला मारलेला षटकार ‘या’ कारणामुळे ठरलायं खास
हॉस्पिटलमधून परतलेला गेल कधी करणार मैदानात पुनरागमन? प्रशिक्षकाने दिले उत्तर
फॅन हूँ मैं! चाहत्याने चक्क सगळं घरच केलंय ‘धोनीमय’
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: क्रिकेटचा गंभीर शिलेदार
IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत
स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू