मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएल 2020 च्या हंगामात जबरदस्त कामगिरी करत गुणतालिकेत प्रथम स्थान पटकाविले. यासाठी संघातील प्रत्येक खेळाडूचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मुंबईने साखळी सामने खेळताना 14 पैकी 9 सामने जिंकले. जिंकलेल्या अथवा पराभूत झालेल्या प्रत्येक सामन्यात कोणत्या ना कोणत्या खेळाडूने आपले चांगले योगदान दिले आहे.
परंतु असे काही खेळाडू आहेत ज्यांचा मुंबईला कोणताही फायदा झालेला नसून त्यांना एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही.
1. ख्रिस लिन
कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुक्त केल्यानंतर 2020 साठी 2 करोड रुपयांच्या किंमतीत मुंबईने ख्रिस लिनला आपल्या संघात जागा दिली. क्विंटन डी कॉकच्या खराब कामगिरीनंतर एक पर्याय म्हणून त्याला संघात घेतले होते. परंतु डी कॉकने जबरदस्त कामगिरी केल्याने लिनला संधी मिळाली नाही. अशातच इशान किशनदेखील सलामीला एक पर्याय म्हणून यशस्वी ठरला. अशात 2 करोडमध्ये लिनला संघात ठेवण्याऐवजी त्याच्या जागी संघात एक मोठा फिरकीपटू घेणे सर्वात योग्य ठरेल. सध्या मुंबईकडे कोणताही दिग्गज फिरकीपटू नसून गेल्या काही सामन्यांत राहुल चाहरलाच संधी दिली जात आहे.
2. शेर्फेन रुदरफोर्ड
शेर्फेन रुदरफोर्ड वेस्ट इंडिज संघाचा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. दिल्लीने मुक्त केल्यानंतर मुंबईच्या संघाने त्याला संघात समाविष्ट करून घेतले. परंतु संघात अगोदरच पोलार्ड आणि पंड्या बंधू असताना त्याला संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला रिलीज करणे मुंबईसाठी योग्य ठरू शकते.
3. मिचेल मॅक्लेनघन
मिचेल मॅक्लेनघन हा गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलचा भाग असून तो मुंबई संघाकडून खेळतोय. त्याने मुंबईसाठी अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. मागील हंगामात लसिथ मलिंगासोबत त्याने उत्तम कामगिरी बजावली होती. या हंगामात दोघांचीही जागा ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सनने घेतली आहे. हे दोघेही जबरदस्त कामगिरी करीत असल्याने मॅक्लेनघनला संघात जागा दिलेली नाही. शिवाय नेथन कुल्टर नाईलदेखील मुंबईचा भाग झाल्याने मिचेल मॅक्लेनघनला कदाचित पुढील हंगामातून मुंबई संघ मुक्त करू शकतो. मिचेल मॅक्लेनघन हा मुंबईचा जुना खेळाडू असल्याने त्याच्याशी संघाच्या भावना आहेत. त्यामुळे मुंबई असे करणार नाही, असे अनेक मुंबई संघाचे समर्थक म्हणत आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: प्रतिभा असूनही ‘हे’ पाच खेळाडू राहिले वंचित, नाही मिळाली संधी
-हैदराबादची प्ले ऑफमध्ये दिमाखात एन्ट्री; ‘या’ ३ कारणांमुळे मुंबईचा दारुण पराभव
-वनडेत १७४ चेंडूत नाबाद ३६ धावा करणाऱ्या गावसकरांनी एकदा सेहवाग स्टाईल केली होती गोलंदाजांची धुलाई
-आर्थिक तंगीमुळे एकेवेळी प्लंबिंग व्हॅन चालणारा क्रिकेटर पुढे वेगाचा बादशाह झाला…
महत्त्वाच्या बातम्या-
-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात बदल, रोहितला मिळणार संधी?
-नाडाने घेतले केएल राहुल- रवींद्र जडेजाचे नमुने; जाणून घ्या कारण