राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेने (नाडा) त्यांच्या नोंदणीकृत चाचणीमध्ये (आरटीपी) समावेश असलेल्या क्रिकेटपटूंचा प्रथमच डोप नमुना घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी या क्रिकेटपटूंना डोप नमुन्यासाठी त्यांचा पत्ता न पुरविल्याबद्दल नाडाने नोटीस बजावली होती. आयपीएलदरम्यान नाडाने क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांचे नमुने घेतले आहेत.
नाडाच्या आरटीपीमध्ये पाच क्रिकेटपटूंचा सहभाग
नाडाने दोन महिला भारतीय क्रिकेटपटू स्म्रीती मंधना, दीप्ती शर्मा यांच्यासोबत रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांना आरटीपीमध्ये समाविष्ट केले होते.
….तर निर्बंधाला सामोरे जावे लागू शकते
या क्रिकेटपटूंना आरटीपीमध्ये समावेश होऊन एक वर्ष झाले आहे, परंतु आजपर्यंत नाडा या क्रिकेटपटूंचा नमुना घेऊ शकले नाहीत. त्याचे मोठे कारण म्हणजे क्रिकेटपटूंकडून त्याचा रहिवासी पत्ता न देणे होय. यामुळे एप्रिल ते जून महिन्यात नाडाने 41 क्रिकेटपटूंना नोटीस बजावली होती. वर्षातून तीन वेळा नोटीस बजावल्यानंतर खेळाडूने टेस्ट मिस केली असे मानले जाते. यासाठी त्याला एक वर्षाच्या निर्बंधाला सामोरे जावे लागू शकते.
दर चार महिन्यांनी द्यावी लागते रहिवासी पत्त्याची माहिती
नमुना घेतला असो अथवा न घेतला असो तरीही, खेळाडूला दर चार महिन्यांनी त्याचा रहिवासी पत्त्याची माहिती द्यावी लागते. वर्षभर या क्रिकेटपटूंचे नमुने न घेतल्यामुळे आयपीएलमध्ये या क्रिकेटपटूंचे नमुने घेण्याची संधी नाडाला मिळाली आहे. त्यांनी आयपीएलमधील इतर नमुन्यांव्यतिरिक्त आरटीपी अंतर्गत या दोन्ही क्रिकेटपटूंचे नमुने घेतले.
आंतरराष्ट्रीय आरटीपीमध्ये सहभागी असलेल्या क्रिकेटपटूंचाही घेतला नमुना
इतकेच नव्हे तर आयपीएलच्या वेळी आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय आरटीपीमध्ये सहभागी असलेल्या क्रिकेटपटूंचे नमुने नाडाने घेतले. या क्रिकेटपटूंमध्ये देश-विदेशातील क्रिकेटपटूंचा समावेश आहे. आयसीसीने त्यासाठी नाडाला परवानगी दिली होती. त्यानंतरच नाडाने आयसीसीच्या आरटीपीमध्ये सहभागी क्रिकेटपटूंचे नमुने घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
-नादच खुळा! हैदराबादने ‘या’ विक्रमात केली मुंबई- चेन्नईसारख्या बलाढ्य संघांची बरोबरी
-मानलं पाहिजे! पराभूत होऊनही मुंबईच्या नावावर ‘मोठ्या’ विक्रमाची नोंद
-बिगुल वाजलं! प्ले ऑफमध्ये चार संघांचे स्थान निश्चित; ‘असे’ असतील क्वालिफायर आणि एलिमिनेटरमधील सामने
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का