आयपीएल किंवा कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे जेतेपद जिंकण्यासाठी कोणत्याही संघात चांगला फिनिशर फलंदाज आवश्यक असतो. क्रिकेट खेळामध्ये फलंदाजांनी नेहमीच वर्चस्व राखल्याचे दिसून आले आहे. जगातील अनेक दिग्गज गोलंदाजांनी आपापल्या संघाला स्वतःच्या बळावर अनेक सामने जिंकून दिले असतील पण फलंदाजांच्या कामगिरीपुढे गोलंदाजांची कामगिरी कमी लेखली जाते.
आयपीएलमध्ये तुफानी फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांची कधी कमतरता जाणवली नाही, असे बरेच खेळाडू आहेत ज्यांना अद्याप आपले कौशल्य दाखवता आलेले नाही. प्रत्येक फलंदाजाची अशी इच्छा असते की त्याला सामना फिनिश करता यावा.या आयपीएल २०२० मध्येही अनेक फलंदाज फिनिशरची भूमीका निभावण्यासाठी उत्सुक असणार आहेत. म्हणून या लेखात अशा ५ खेळाडूंची नावे आहेत जे आयपीएल २०२० मध्ये स्वत: ला फिनिशर म्हणून सिद्ध करू शकतात.
५. ईशान किशन (Ishaan Kishan) – मुंबई इंडियन्स
आयपीएलमधील वेगवान अर्धशतक झळकावणारा पाचवा भारतीय फलंदाज, इशान किशन ह्याने आयपीएल २०१८ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना शानदार खेळी केली. त्या सामन्यात किशनने १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते.
त्या सामन्यात किशनने २१ चेंडूत ६२ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, त्या खेळीमध्ये ६ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. त्याच्या अप्रतिम खेळीमुळे मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर २० षटकांत २११ धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि तो सामना मुंबई संघाने १०२ धावांनी जिंकला.
इशानकडे हीटिंग पॉवर आहे, परंतु त्याला त्याचा खेळ अजून चांगल्या पद्धतीने सुधारून समजदारीने खेळावे लागेल. धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला अशाच खेळाडूची आवश्यकता असेल जो शेवटी संघ जिंकून सामना संपवू शकेल. याच कारणास्तव, ईशान किशनलाही आयपीएल २०२० मध्ये मॅच फिनिशर म्हणून स्वत: ला सिद्ध करायला आवडेल जेणेकरून तो शक्य तितक्या लवकर भारतीय संघात प्रवेश करू शकेल.
४. शिमरॉन हेटमीयर (Shimron Hetmeyer) – दिल्ली कॅपिटल
गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फ्लॉप झालेल्या शिमरोन हेटमीयरला यावेळी दिल्ली कॅपिटल संघात स्थान मिळाले आहे. मागील हंगामात दिल्ली कॅपिटल संघाला फिनिशरची सर्वाधिक कमतरता भासली. म्हणून ह्या यावेळी त्याला स्वत: ला फिनिशर म्हणून सिद्ध करावे लागेल.
यावर्षीच्या आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल संघाने शिमरोन हेटमीयर आणि अॅलेक्स कॅरी या खेळाडूंना त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज हेटमीयरला आपल्या संघाचा फिनिशर खेळाडू म्हणून ओळखले जाते आणि तो आता दिल्ली कॅपिटल संघासाठीही असे करू शकतो.
यंदाच्या आयपीएल लिलावात ७.७५ कोटी रुपये देऊन दिल्ली कॅपिटलने त्याचा संघात समावेश केला आहे. दिल्लीला अशा खेळाडूची आवश्यकता आहे जो कोणत्याही क्रमांकावर स्फोटक खेळी करू शकेल आणि हेटमीयर तसे करण्यात माहिर आहे आणि अशा परिस्थितीत तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असणे निश्चित आहे.
३. सुरेश रैना (Suresh Raina) – चेन्नई सुपर किंग्ज
‘मिस्टर आयपीएल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रैनाने आयपीएलमध्ये नेहमीच चमकदार कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये रैनाने अनेक उत्कृष्ट डाव खेळले असले तरी त्यांच्या १ डाव सर्वात विशेष होता. २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धत्या रैनाने १६ चेंडूत तुफानी अर्धशतक झळकावले होते. त्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नई सुपर किंग्जसमोर २० षटकांत २२७ धावांचे लक्ष्य ठेवले. पण चेन्नई संघ ते लक्ष्य साध्य करण्यात अपयशी ठरला. मात्र सामन्यादरम्यान रैनाने उत्कृष्ट खेळी खेळली.
या सामन्यात रैनाने १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर त्याने २५ चेंडूत ८७ धावांची शानदार खेळी केली, ज्यात ६ षटकार आणि १२ चौकारांचा समावेश होता. आयपीएल २०२० मध्ये रैनाला मॅच फिनिशर म्हणूनही स्वत:ला सिद्ध करावे लागेल, कारण धोनीशिवाय चेन्नईकडे चांगला सामना फिनिशर नाही. याशिवाय रैनाही भारतीय संघात पुनरागमन करण्यास उत्सुक असेल.
२. केएल राहुल (KL Rahul) – किंग्ज इलेव्हन पंजाब
या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणार्या केएल राहुलला पंजाबचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. त्याचा सलग २ हंगामामधील शानदार फॉर्म पाहता त्याला पंजाब संघाचे कर्णधारपद दिले आहे. मागील हंगामात राहुलही सर्वाधिक धावांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर होता.
एवढेच नव्हे तर २०१८च्या हंगामात आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्यांच्या आधी हा विक्रम युसुफ पठाण आणि सुनील नरेन यांच्या नावावर होता. केएल राहुलने आयपीएल २०१८ मध्ये दिल्ली संघाविरूद्ध हा विक्रम आपल्या नावावर केला होता.
त्या सामन्यात दिल्लीच्या कॅपिटलने किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर २० षटकांत १६७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना त्याने फक्त १४चेंडूत अर्धशतक ठोकले आणि १६ चेंडूत ५१ धावा केल्या. त्यात ४ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता.
राहुल हा पंजाबचा सलामीवीर असला तरी गेल्या वर्षी त्यानेही अनेक सामने फिनिश केले आहेत. भारतीय संघातही हा खेळाडू आता फिनिशरची भूमिका साकारत आहे. अशा परिस्थितीत राहुल आयपीएल २०२० मध्ये फिनिशरची भूमीका निभावू शकतो.
१. बेन स्टोक्स (Ben Stokes) – राजस्थान रॉयल्स
विश्व क्रिकेटमध्ये आपल्या दबदबा निर्माण करणाऱ्या बेन स्टोक्सला आयपीएलमध्ये काही विशेष करता आलेले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ज्याप्रमाणे खेळ केला आहे आयपीएलमध्ये तितकाच प्रभावी खेळ दाखविण्यात अपयशी ठरला आहे.
बेन स्टोक्स एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने इंग्लंड क्रिकेट संघाला २०१९ चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तो फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. त्याच्या गुणवत्तेमुळे २०१७ मध्ये, रायझिंग पुणे सुपरजायंटने त्याला १५.५ कोटीमध्ये विकत घेतले होते.
त्या मोसमात, स्टोक्सने १२ सामन्यांत एकूण ३१६ धावा केल्या आणि तसेच ७.१८ च्या इकॉनॉमी रेटने १२ विकेट्सही घेतल्या. यानंतर २०१८ आणि २०१९ च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना स्टोक्सने बरी कामगिरी केली. मागील हंगामात स्टोक्सने ९ सामन्यांत १२३ धावा केल्या आणि त्याने ६ विकेट्स घेतल्या. मात्र आयपीएल २०२० मध्ये स्टोक्स स्वतःला निश्चितच मॅच फिनिशर म्हणून सिद्ध करण्यासाठी उत्सुक असेल.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०- डेथ ओव्हर्समध्ये या ५ गोलंदाजांकडे असणार जगाचे लक्ष
क्रिकेटच्या टी-२० प्रकारात सर्वाधिक चेंडू खेळणारे ७ क्रिकेटर, २ आहेत भारतीय
सध्याच्या टीम इंडियाचे ३ मुख्य शिलेदार, ज्यांनी एकाही सामन्यात केली नाही कॅप्टन्सी
महत्त्वाच्या बातम्या –
यावेळी आयपीएलमध्ये चुकिला माफी नाही! ती एक चुक खेळाडूंना पडणार भलतीच महागात
आयपीएल २०२० खेळणार नाही, सर्वाधिक चर्चेत असलेला मिचेल स्टार्क, न खेळण्याचे…
३ वनडेत ८ चेंडू खेळून १ धाव करत ३ वेळा बाद होण्याचा कारनामा केलाय या खेळाडूने