इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यास अजून एक आठवडा शिल्लक आहे. आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगसाठी संघातील कॉम्बिनेशन हे डोकेदुखी ठरली आहे. आर अश्विन, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्माची तंदुरुस्ती पाहता अंतिम अकरा खेळाडू निवडणे कठीण होणार आहे.
हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामन्याने होणार आहे. असे असले तरीही दिल्ली कॅपिटल्स संघाची कॉम्बिनेशन अजूनही डोकेदुखी ठरत आहे. दिल्ली संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या आर अश्विन आणि राजस्थान रॉयल्सच्या अजिंक्य रहाणे यांचा यंदा संघात समावेश केला आहे.
विशेष म्हणजे जेव्हा रिकी पाँटिंग आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनाने या खेळाडूंना त्यांच्या संघामध्ये सामील केले होते. तेव्हा त्यांनी फिरोजशाह कोटलाची खेळपट्टी लक्षात घेऊन आपली योजना तयार केली होती. परंतु कोरोना विषाणूने त्यांची योजना पूर्णपणे बिघडवली आहे.
अश्विनला मिळू शकते पहिल्या सामन्यात संधी
विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघात युवा खेळाडूंसह उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही समावेश आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या वरच्या फळीबद्दल बोलायचं झालं, तर पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि शिखर धवन यांचा समावेश आहे, जे संघात असणे जवळपास शक्य आहे. सोबतच संघात अमित मिश्रा (१५७ विकेट्स), अक्षर पटेल आणि मोहित शर्माही आहेत. अशामध्ये अय्यरकडे अनुभवी खेळाडूंना संघात सामील करण्याची डोकेदुखी आहे. तरीही, अपेक्षा आहे की अय्यर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्यात आर अश्विनला सामील करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
-आरसीबीचा कर्णधार विराटने ‘या’ गोष्टीवर आधीपासूनच लक्ष दिले असते तर आज…
-ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यात आज दुसरा वनडे सामना; जाणून घ्या सर्वकाही…
-‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया लवकरच तुम्हाला तुमची चुक कळेल,’ भारतीय दिग्गजाने साधला थेट बोर्डावर निशाणा
ट्रेंडिंग लेख-
-दुसऱ्या काळात जन्न्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता
-हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार
-इरफानला एकाच ओव्हरमध्ये २४धावा कुटणारा ‘ज्युनियर सेहवाग’ आयपीएल गाजवायला सज्ज