---Advertisement---

आयपीएलपूर्वी होणारा तो सामना आता होणार आयपीएलनंतर?

On: शुक्रवार, फेब्रुवारी 21, 2020 7:15 PM
---Advertisement---

आयपीएल 2020चा (IPL 2020) 13वा हंगाम (IPL 13th Season) 29 मार्चपासून सुरु होणार असून 24 मेपर्यंत रंगणार आहे. या मोसमानंतर ऑल स्टार’ या चॅरिटी सामन्याचे आयोजन होणार असल्याची चर्चा आहे. याआधी हा सामना आयपीएलपुर्वी होणार असल्याचे म्हटले जात होते. त्याबद्दल बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीनेही सांगितले होते.

परंतु काही औपचारिक कारणांमुळे हा सामना आयपीएल नंतर घेण्यात येणार आहे. मात्र, अजूनही सामन्याची दिनांक आणि ठिकाण निश्चित झाले नाही.

आईपीएल संचालन परिषदेचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले आहे की, “हा सामना आयपीएल नंतर घेण्यात येईल. आम्ही प्रथम खेळाडूंची कामगिरी पाहू आणि त्याआधारे दोन्ही संघांची निवड करू.”

ऑल स्टार सामन्याची कल्पना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना सुचली होती. परंतु, आयपीएलपुर्वी हा सामना घेण्याच्या प्रस्तावावर फ्रेंचायझींनी आक्षेप घेतला असल्याचेही वृत्त आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1230824879479558150

https://twitter.com/Maha_Sports/status/1230808019262484481

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---