आयपीएल 2020 स्पर्धेत अनेक खेळाडूंनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. याच हंगामात काहींनी मात्र निराशाजनक कामगिरी केली. त्यांनी केलेली कामगिरी ही आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी ठरली असून ते हा हंगाम कधीही आठवणार नाहीत असेच दिसते.
७ खेळाडू ज्यांनी केली निराशाजनक कामगिरी
1. एमएस धोनी
एमएस धोनी हा भारतीय संघाचा माजी कर्णधार. आयपीएल स्पर्धेत चेन्नईच्या संघांचे नेतृत्त्व तो अगदी सुरुवातीपासून करतोय. हे पहिले असे वर्ष होते. जे त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईचा संघ ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचला नसेल. फलंदाजी करतानाही धोनी अयशस्वी ठरला आहे. त्याने या हंगामात केवळ 200 धावा केल्या आहेत.
2. शेन वॉटसन
शेन वॉटसन हा देखील चेन्नई संघाचा सलामीचा फलंदाज आहे. चेन्नई कडून या हंगामात बहुतांश सामन्यासाठी त्याला संधी दिली गेली. सलामीला अयशस्वी ठरल्यानंतर त्याला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरही खेळवून पाहिले होते. मात्र, तो कोणत्याही प्रकारे चांगला खेळ करू शकला नाही. त्याने या हंगामात 299 धावा केल्या आहेत.
3. ग्लेन मॅक्सवेल
मॅक्सवेल फलंदाजीस उतरल्यानंतर समोरच्या संघाला घाम फुटत असे. मधल्या फळीत उतरलेला हा फलंदाज बाद करण्यासाठी विशेष योजना आखाव्या लागत होत्या. हा खेळाडू कमीतकमी चेंडू खेळून जास्तीत जास्त धावा करतो. परंतु या हंगामात तो पूर्णपणे चाचपडताना दिसत होता. त्याने संपूर्ण हंगामात पंजाब कडून खेळताना मात्र 108 धावा केल्या.
4. आंद्रे रसल
मागील हंगामात कोलकाता संघाला अविश्वसनीय व अद्भूत अशा प्रकारे गमावलेले सामने घशातून आणून रसल ने काढून दिले होते. फलंदाजीस उतरल्या नंतर खतरनाक फटकेबाजी करणारा हा अष्टपैलू खेळाडू या हंगामात असूनही नसल्यासारखा होता. रसलचा खेळ थंडावल्याने समोरील गोलंदाज त्याची धास्ती न घेता गोलंदाजी करीत होते. मागील हंगामात 510 धावा करणाऱ्या रसलने या हंगामात मात्र 117 धावा केल्या.
5. पॅट कमिन्स
कोलकाता संघाचा हा गोलंदाज या हंगामातील सर्वात महाग विकल्या गेलेल्या गोलंदाजांपैकी एक आहे. पहिल्या 10 सामन्यांत त्याने फक्त 3 बळी घेतले होते. परंतु शेवटच्या 4 सामन्यांत पुनरागमन करीत त्याने 9 गडी बाद केले. त्याच्या कडून संघाचा मोठा अपेक्षाभंग झाला आणि संघ देखील स्पर्धे बाहेर गेला. पॅट कमिन्सने या हंगामात फक्त 12 बळी घेतले आहेत.
6. ऍरॉन फिंच
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा 33 वर्षीय सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंचला आयपीएल 2020मध्ये सलामीला संधी मिळाली. परंतु त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याच्या जागी सलामीला आलेला युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने अफलातून कामगिरी केली आणि सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. फिंचने या हंगामात 11 सामने खेळताना 21.45 च्या सरासरीने 236 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच निराश केले आहे. फिंचच्या जागी जॉश फिलिपला संघात सामील केले.
7. पृथ्वी शॉ
दिल्ली कॅपिटल्सचा २० वर्षीय युवा फलंदाज पृथ्वी शॉने 5 ऑक्टोबरला बेंगलोरविरुद्ध 23 चेंडूत 42 धावांची खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. परंतु हंगामाच्या शेवटच्या सहा सामन्यात त्याने 19, 4, 0, 0 आणि 7 धावांचीच खेळी केली. त्यामुळे त्याला दोन सामन्यांसाठी संघातून बाहेर बसवले होते. त्याने या हंगामात केवळ 228 धावा केल्या. त्याच्या जागी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला संघात स्थान दिले होते. रहाणेने बेंगलोरविरुद्ध नुकत्याच झालेल्या सामन्यात ६० धावांची महत्त्वपूर्ण विजयी खेळी केली होती.
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: प्रतिभा असूनही ‘हे’ पाच खेळाडू राहिले वंचित, नाही मिळाली संधी
-हैदराबादची प्ले ऑफमध्ये दिमाखात एन्ट्री; ‘या’ ३ कारणांमुळे मुंबईचा दारुण पराभव
-वनडेत १७४ चेंडूत नाबाद ३६ धावा करणाऱ्या गावसकरांनी एकदा सेहवाग स्टाईल केली होती गोलंदाजांची धुलाई
महत्त्वाच्या बातम्या-
-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात बदल, रोहितला मिळणार संधी?
-नाडाने घेतले केएल राहुल- रवींद्र जडेजाचे नमुने; जाणून घ्या कारण