अबु धाबी। आयपीएल २०२० च्या १३ व्या हंगामातील आतापर्यंत २५ सामने झाले आहेत. मात्र आयपीएलमधील फ्रँचायझी संघ किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा धडाकेबाज फलंदाज ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलला आतापर्यंत एकही सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही. गेलने नुकताच आपला एक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.
गेलने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो रुग्णालयात बेडवर झोपलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तो युनिव्हर्स बॉस आहे.
गेलने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, “मी तुम्हाला हे सांगू शकतो की, मी कधीही लढल्याशिवाय पराभूत होणार नाही. मी युनिव्हर्सल बॉस आहे. जो कधीही बदलणार नाही. तुम्ही माझ्याकडून शिकू शकता. परंतु असे नाही की, मी जे काही करेल ते तुम्ही फॉलो केले पाहिजे. माझी स्टाईल आणि चमक विसरू नका. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.”
https://www.instagram.com/p/CGK9-9XF7oa/?utm_source=ig_web_copy_link
गेल ८ ऑक्टोबरला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पोटात दुखायला लागल्यामुळे सामना खेळू शकला नव्हता. संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेने म्हटले होते की, “गेल आजचा सामना खेळणार होता. परंतु तो आजारी आहे. त्याला अन्नातून विषबाधा झाली. त्यामुळे तो अंतिम अकराचा भाग नाही.”
पंजाब संघाच्या फलंदाजीमध्ये समस्या येत आहे. संघाचा कर्णधार केएल राहुल आणि मयंक अगरवालला सोडले तर इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता येत नाहीये.
आयपीएल २०२० च्या २४ व्या सामन्यात शनिवारी (१० ऑक्टोबर) पंजाब संघाला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध केवळ २ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. पंजाब संघ पॉईंट टेबलमध्ये २ गुणांसह शेवटच्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-“माझी तुलना तीही रोहित शर्माशी…”, युवा पाकिस्तानी क्रिकेटरने केले मोठे वक्तव्य
-विराटने धोनीची घेतलेली गळाभेट पाहून चाहत्यांनाही झाला आनंद, पाहा व्हिडिओ
-आला रे! हैदाराबादविरुद्धच्या सामन्यातून राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे पुनरागमन
ट्रेंडिंग लेख-
-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
-फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा
-आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ