मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा फ्रेंचायझी संघ चेन्नई सुपर किंग्ज हा सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वात ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे. गेल्या महिन्यातच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, त्यामुळे आता आयपीएलमध्ये त्याच्यानंतर संघाचा कर्णधार कोण याची चर्चा होत आहे.
एमएस धोनीनंतर संघातील सर्वात अनुभवी नाव सुरेश रैना आहे. पहिल्या हंगामापासून तो संघात आहे. धोनीनंतर त्याला कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. या हंगामात, त्याने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली आहे. परंतु त्याचे संघाशी असलेले नाते बिघडलेले नाही. चेन्नई सुपर किंग्जच्या मालकाने म्हटले आहे की, ते रैनाला आपल्या मुलासारखाच समजतात.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अष्टपैलू ड्वेन ब्राबोने धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्जचा पुढचा कर्णधार कोण असू शकेल हे सांगितले. तो म्हणाला “मला माहित आहे की, हे त्याच्या मनात कुठेतरी चालूच असावे, याचा अर्थ असा आहे की आपल्या सर्वांना कधी ना कधी आपला खेळ सोडून द्यावा लागेल. ही फक्त वेळची बाब आहे. आपल्याला जागा सोडावी लागेल आणि रैना किंवा इतर काही तरुण खेळाडू असो की कोणाला तरी ही जबाबदारी सोपवावी लागेल.”
तथापि, रैना या हंगामात खेळणार की नाही याबद्दल शंका आहे. युएईहून तो भारतात परतला आहे, पण आयपीएलमध्ये परतीचे संकेतही दिले आहे. यावेळी आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये खेळला जाणार आहे.