तीन वेळा आयपीएलचा चषक उंचावलेल्या चेन्नई सुपर किंग्सची सध्याच्या हंगामातील कामगिरी ही प्रचंड निराशाजनक आहे. संघातील अनेक खेळाडू यामुळे चिंतेत असून संघासाठी काय करता येईल, याचाच विचार करत आहेत. इम्रान ताहीर हा देखील चेन्नई संघाचा मागील अनेक वर्षांपासून संघसहकारी आहे. २०१९ म्हणजेच गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये ताहीरने पर्पल कॅप पटकावत, हंगामात सर्वाधिक बळी घेतले होते. यावर्षी मात्र इम्रान ताहीरचा अद्याप संघात समावेश करण्यात आलेला नाही. या सर्व बाबींवर इम्रान ताहीरसोबत आर अश्विनने यूट्यूब शोमध्ये चर्चा केली. यावेळी त्याने अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली.
अश्विनच्या यूट्यूब शो मध्ये ताहीरची खुल्या मनाने चर्चा…
इम्रान ताहीर हा चेन्नईच्या संघात असूनही त्याने अद्याप एकही सामना खेळलेला नाही. मात्र, नुकताच तो मैदानावर ‘ड्रिंक बॉय’च्या भूमिकेत दिसला होता. यावर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. अश्विनसोबत बोलताना ताहीरने आपल्या त्या भूमिकेबाबत देखील खुल्या मनाने मत व्यक्त केले आहे. तसेच त्याने प्रमुख अकरा संघात समावेश न होणे, चेन्नई संघ यांबाबत देखील भरभरुन सांगितले आहे.
…आणि तेव्हा मी ड्रिंक बॉय बनल्यावर नेमकं काय वाटतं ते समजू शकलो- ताहीर
इम्रान हा चेन्नई संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. तरीही आयरपीएलच्या या चालू हंगामात त्याला अद्याप संघात स्थान मिळालेले नाही. परंतु, नुकताच एका सामन्यात तो ‘पाणक्या’ बनून मैदानावर उतरला होता. याबाबत त्याला विचारले असता त्याने, ‘मी फाफ डु प्लेसीस सारख्या एका दिग्गज खेळाडूला पूर्ण हंगामात मैदानावर पाणी घेऊन जाताना पाहिले आहे. तसेच, आता मीही ती भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे, एक विश्वस्तरीय खेळाडू असूनही ड्रिंक बॉय बनल्यानंतर काय वाटते, ते आपण आता चांगलेच समजू शकतो‘, असे ताहीरने म्हटले.
चेन्नईच्या संघातील खेळाडूंना मिळणारा आदर दुर्मिळ…
इम्रान ताहीरने त्याच्या आयपीएलच्या कारकिर्दीची सुरुवात चेन्नई संघातून केली. तसेच, आर अश्विनने देखील त्याच्या आयपीएल कारकिर्दीला चेन्नई संघातून सुरुवात केली आहे. त्यामुळे त्या दोघांना जोडणारा समान दुवा म्हणजे चेन्नई सुपर किंग्स. या संघाबद्दल काय सांगशील, असे इम्रान ताहीरला विचारले असता त्याने, ‘चेन्नई संघाला आणि त्यांच्या खेळाडूंना मिळणारा आदर हा इतर कोणत्याही संघातील खेळाडूला अथवा संघाला मिळत नसल्याचे मी पाहतोय’, असे म्हटले.
तसेच, ‘चेन्नई संघाचे संघ व्यवस्थापन देखील खेळाडूंची विशेष काळजी घेते. कोणताही सामना तुम्ही हरले अथवा जिंकले तरीही व्यवस्थापन तुमच्यासोबत चांगलीच वागणूक ठेवते’, असेही इम्रान ताहीरने सीएसकेबाबत बोलताना म्हटले आहे.
…त्यामुळेच संघात जागा मिळवणे सध्या अवघड जातंय
मागील हंगामात पर्पल कॅपचा मानकरी राहिलेला खेळाडू या हंगामात मात्र अद्याप संघाबाहेर, या विषयावर इम्रान ताहीरला विचारले असता त्याने या प्रकरणावर स्पष्ट मत व्यक्त केले. ‘चेन्नई सारख्या संघात एकदा का चार विदेशी खेळाडूंनी आपली जागा भक्कम केली की, त्यानंतर पाचव्या खेळाडूला स्वतःची जागा बनवणे थोडे अवघड जाते. यासाठी कधी कधी खूप वाट पाहावी लागते.’ असे म्हणत इम्रान ताहीरने त्याच्या संघात समावेश न होण्याबद्दलचे मत व्यक्त केले. तसेच, आपण संघात लवकरच सामील होवू असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
आयपीएल २०२० मध्ये सध्या तळाशी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी मोठ्या चमत्काराचीच गरज आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच चेन्नईची इतकी खराब कामगिरी झाल्यामुळे चेन्नई संघाचे व्यवस्थापन मंडळ देखील प्रचंड चिंतेत आहे. इम्रान ताहीर सारख्या खेळाडूला देखील संघाचे हे अपयश चांगलेच सतावत असल्याचे या यूट्यूब शो मध्ये दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या-
-ते माझे कर्तव्यच! चेन्नईसाठी वॉटर-बॉय झालेल्या ताहिरच्या भावूक ट्विटने जिंकली चाहत्यांची मने
-IPL 2020 Playoff: बेंगलोरच्या विजयाने केल्या चेन्नईच्या आशा पल्लवित; आता एका जागेसाठी ५ दावेदार
-सीएसकेला दूसऱ्या ड्वेन ब्रावोचा शोध, ‘ही’ ३ नावं आहेत चर्चेत
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
-आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
-आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज