---Advertisement---

IPL 2020: चेन्नईविरुद्ध खणखणीत ३ षटकार ठोकत विजय मिळाल्यानंतर काय म्हणाला अक्षर पटेल?, घ्या जाणून

On: रविवार, ऑक्टोबर 18, 2020 4:02 PM
---Advertisement---

शारजाह। आयपीएल २०२० मधील ३४ वा सामना शनिवारी (१७ ऑक्टोबर) शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने ५ विकेट्सने जिंकला. दिल्लीच्या या विजयात अष्टपैलू अक्षर पटेलने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. सामन्यानंतर अक्षरने म्हटले की, शेवटच्या षटकात तो रवींद्र जडेजाच्या चेंडूंना योग्य वेळेत फटकावण्याचा प्रयत्न करत होता.

iplt20.com वर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये अक्षरने धवनला सांगितले की, “जेव्हा मी पाहिले की शेवटच्या षटकात फिरकीपटू जडेजा गोलंदाजी करत आहे आणि एका बाजूने बाऊंड्री लहान आहे. त्यावेळी मी चेंडूला वेळेवर हिट करण्याचा प्रयत्न करत होतो. मी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत नव्हतो.”

दिल्ली संघाला शेवटच्या ३ षटकांमध्ये १७ धावांची आवश्यकता होती. अक्षरने जडेजाने टाकलेल्या शेवटच्या षटकात ३ षटकार ठोकत दिल्लीला विजय मिळवून दिला. त्याने केवळ ५ चेंडू खेळत नाबाद २१ धावांची खेळी केली.

चेन्नईने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्स गमावत १७९ धावा केल्या. हे आव्हान दिल्ली संघाने ५ विकेट्स गमावत १९.५ षटकात १८५ धावा करत पूर्ण केले.

याच सामन्यात दिल्लीचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने नाबाद १०१ धावा करत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. या विजयासह दिल्ली संघाने २ गुणांची कमाई केली आणि गुणतालिकेत एकूण १४ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला.

महत्त्वाच्या बातम्या-

-“धवनच्या विकेटसाठी चेन्नईचे हवन”, दिल्लीविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे ट्विटरवर उडतेय खिल्ली

-शतक झळकावूनही शिखर धवनने केला ‘हा’ नकोसा विक्रम

-Video: जेव्हा पंत, स्टॉयनिसने काढली रिकी पाँटिंगची खोड, पुढे काय झालं पाहा

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली

-यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे

-आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---