शारजाह | आयपीएलमध्ये शुक्रवारी(23 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा 10 गडी राखून दारुण पराभव केला. मुंबईचे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी पॉवरप्लेमध्ये चेन्नईच्या वरच्या फळीतील फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पॉवरप्लेमध्येच चेन्नईचा पराभव झाला होता असे मत चेन्नईचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग याने व्यक्त केले आहे.
बोल्ट आणि बुमराह यांनी मोडलं चेन्नईच कंबरडं
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना बोल्ट आणि बुमराहने चेन्नईच कंबरडं मोडलं. दोघांनी मिळून डावाच्या पहिल्या तीन षटकांत चार बळी घेतले. चेन्नई संघाने 30 धावांत 6 गडी गमावले होते. त्यानंतर अष्टपैलू सॅम करनने 47 चेंडूत 52 धावा ठोकत संघाची धावसंख्या 114 पर्यंत पोहोचवली. मात्र, डावाच्या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो तंबूत परतला. चेन्नई संघ 20 षटकांत 9 बाद 114 धावा करु शकला. प्रत्युत्तरादाखल मुंबईने 12.2 षटकांत एकही बळी न गमावता हे लक्ष्य गाठले.सलामीवीर ईशान किशनने नाबाद 68 आणि क्विंटन डी कॉकने 46 धावा केल्या.
पॉवरप्लेमध्येच संपला होता सामना-फ्लेमिंग
सामन्यानंतर फ्लेमिंग म्हणाला की, “अर्धा संघ पॉवरप्लेमध्येच तंबूत परतल्यानंतर सामन्यात आमच्या संघासाठी काहीच उरले नव्हते. आम्हाला खरोखरच धक्का बसला. आमच्यासाठी ही खूप वाईट बाब होती. सुरुवातीचे गडी बाद झाल्यावर पॉवरप्लेमध्येच खेळ जवळजवळ संपला होता.”
चेन्नईचा इतिहासातील होता मोठा पराभव
शुक्रवारी (23 ऑक्टोबर) आयपीएलच्या इतिहासात चेन्नईला सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईचा प्रथमच 10 गडी राखून पराभव झाला. यापूर्वी 2008 मध्ये चेन्नईचा नऊ गडी राखून पराभव झाला होता. हा सामना मुंबई आणि चेन्नई यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता.
चेन्नईच्या आशा आल्या संपुष्टात
गुणतालिकेत चेन्नई संघ तळाशी आहे. चेन्नईसाठी आयपीएलचा 13 वा हंगाम आतापर्यंत खूप आव्हानात्मक ठरला. संघ 11 पैकी केवळ तीन सामने जिंकू शकला. या संघाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आज कोलकाता-दिल्ली आणि पंजाब-हैदराबाद येणार आमनेसामने; प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी झुंज
काय सांगता? फक्त एका चेंडूत काढल्या २८६ धावा, वाचा कधी झाला हा अनोखा विक्रम
आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध जे कोणत्याच संघाला करता आले नाही ते मुंबई इंडियन्सने करुन दाखवले
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनीचा चेन्नई संघ झाला फ्लॉप, ही आहेत ३ प्रमुख कारणे
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’






