आयपीएलमध्ये शनिवारी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी व आजी कर्णधार विराट कोहली यांच्या संघात सामना होत आहे. दुबईत होत असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ गुणतालिकेतील आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. दोनही संघांना गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या सामन्यात असे असतील हे दोन संघ-
चेन्नई सुपर किंग्ज
सीएसके संघात आज काही बदल होऊ शकतात. फाफ डुप्लेसीस व शेन वॉटसन हे संघाकडून सलामीला येतील. तर मध्यक्रमात अंबाती रायडू, एमएस धोनी, रुतूराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, रविंद्र जडेजा, सॅम करन दिसण्याची शक्यता आहे. गोलंदाजीची धुरा शार्दुल ठाकूर, दिपक चाहर व कर्ण शर्मा सांभाळतील.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
बेंगलोर संघातही या सामन्यात काही बदल दिसतील. देवदत्त पडिक्कल व ऍरोन फिंच सामन्यात सलामीला फलंदाजी करताना दिसतील. तर मध्यक्रमात विराट कोहली, एबी डिविलियर्स, मोईन अली, गुरकीरत मान, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे खेळताना दिसू शकतात. गोलंदाजीची धुरा युझवेंद्र चहत, इसुरू उडाना व नवदीप सैनी सांभाळताना दिसू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आम्ही संघाचे उत्तम संयोजन केले, म्हणूनच..’ KKR च्या प्रशिक्षकाने सांगितले कुलदीपला वगळण्याचे कारण
फ्रेंच ओपन २०२०: श्वार्टझमनला पराभूत करून नदालचा फायनलमध्ये प्रवेश, जोकोविचशी होणार अंतिम लढत
IPL 2020: राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यानंतरची जाणून घ्या ‘ही’ खास आकडेवारी
ट्रेंडिंग लेख –
शेन वॉर्नने त्याला म्हटले होते भारताचा मोठा स्टार; पण ‘तो’ अचानकच झाला आयपीएलमधून गायब आणि आता…
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला






