इंडियन प्रीमियर लीग २०२० (आयपीएल २०२०) च्या दुसर्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रमुख प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार केएल राहुल यांनी ख्रिस गेलला संघातून बाहेर ठेवत सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
दिल्ली कॅपिटल्सशी झालेल्या सामन्यात पंजाबने युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला. पंजाबने मॅक्सवेल, ख्रिस जॉर्डन, शेल्डन कॉट्रेल आणि निकोलस पूरन या चार विदेशी खेळाडूंना संधी दिली.परंतू गेलला संघात न पाहून चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले होते.
ख्रिस गेलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावली असून त्याच्या नावावर २८ अर्धशतके आहेत. तसेच गेलची सरासरी ४१.१३ आहे पण तरीही पंजाबने त्याला संघात संधी दिली नाही.
खरं तर गेलची फिटनेस पूर्वीसारखी नाही, तो ४० वर्षांचा आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेने आधीच सांगितले होते की, गेल बहुतेक या हंगामात बेंचवर बसलेला दिसून येईल. युवा फलंदाजांना मदत करण्याची त्याची भूमिका असेल.
गेललाही त्याच्या भूमिकेविषयी अंदाज आहे आणि हे माहित आहे की या हंगामात तो एक सल्लागार म्हणून संघात असू शकतो. यामुळेच गेल आपल्याच स्टाईलमध्ये आयपीएलचा आनंद घेत आहे.
https://www.instagram.com/p/CFW9AOeJQ6T/?utm_source=ig_embed
सध्या गेलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो भोजपुरी गाण्यावर नाचताना दिसत आहे. ख्रिस गेल दिल्लीविरुद्ध नाणेफेक करण्यापूर्वी नाचताना दिसला. त्याने डेब्यू कॅप वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलला दिली, त्यादरम्यान तो या वेगवान गोलंदाजाला सॅलूट करत नाचला.