आयपीएल 2020चा हंगाम जवळ आला आहे. आयपीएलचा हा 13वा हंगाम (2020 IPL13th Season) असणार आहे. या हंगामात फिरकीपटू आर अश्विन दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे.
किंग्स इलेव्हन पंजाबने अश्विनचा बदली खेळाडू म्हणून दिल्लीकडून फिरकीपटू जगदीश सुचितला संघात घेतले आहे.
“दिल्लीच्या घरच्या खेळपट्टीवर अश्विन चांगली कामगिरी करू शकतो,” असे मत दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंगने व्यक्त केले आहे.
“अश्विन ज्या संघाकडून खेळतो, तो त्या संघाचा महत्त्वाचा भाग बनतो. मला विश्वास आहे दिल्ली कॅपिटल्सबरोबरही असेच काही होईल,” असे रिकी पाँटिंग म्हणाले.
“दिल्लीच्या मैदानाची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी नेहमी फायदेशीर ठरते. मला असे वाटते की अश्विन त्याच्या चतुर गोलंदाजीने संघावर मोठा परिणाम करेल,” असेही पाँटिंग यावेळी म्हणाला.
“मी सुचितला शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की, तो नवीन संघासोबत खेळण्यासाठी नक्कीच उत्साहित असेल,” असे पाँटिंग म्हणाला.
अश्विन हा आयपीएलमधील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने मागील 2 वर्षात 28 सामन्यात किंग्स इलेव्हन संघाचे नेतृत्व केले होते. त्यापैकी, 12 सामने जिंकले आणि 16 सामन्यात पराभव स्विकारावा लागला.
आयपीएलमध्ये अश्विनने एकूण 139 सामन्यांत 6.79 च्या सरासरीने 125 विकेट्स घेतले आहेत. त्याने 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्स कडूनखेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होेते.
पुढे तो रायझिंग पुणे सुपरजाईंट्सकडून खेळला आणि त्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला.
युसूफ पठानने घेतलेल्या अप्रतिम झेलवर राशिद खान म्हणतो
वाचा- 👉https://t.co/3xhb04XBB7👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019
या नव्या शहरात खेळवले जाणार आयपीएल२०२० चे सामने
वाचा- 👉https://t.co/Ro74YzgViH👈#म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019