---Advertisement---

चेन्नईचा सलग दुसरा पराभव, पृथ्वी शॉ आणि रबाडा दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार

---Advertisement---

दुबई। शुक्रवारी(२५ सप्टेंबर) आयपीएल२०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्सचा ४४ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १७५ धावा केल्या आणि चेन्नईला १७६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला ७ बाद १३१ धावाच करता आल्या.

चेन्नईकडून फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक ३५ चेंडूत सर्वाधिक ४३ धावा केल्या. पण त्यालाही चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही. त्याच्याव्यतिरिक्त केदार जाधवने २६ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त चेन्नईच्या एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार एमएस धोनी १५, शेन वॉट्सन १४, मुरली विजय १०, रवींद्र जडेजा १२ धावा करुन बाद झाले. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेलने १ आणि एन्रीच नॉर्किएने २ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी दिल्लीकडून पृथ्वी शॉने सर्वाधिक ६४ धावा केल्या. त्याने ४३ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह ही खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त श्रेयस अय्यरने २६, शिखर धवनने ३५ आणि रिषभ पंतने ३७ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला १७५ धावांचा टप्पा गाठणे शक्य झाले. चेन्नईकडून पियुष चावलाने २ आणि सॅम करनने १ विकेट घेतली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---