जगभरातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय असलेली टी२० लीग म्हणजेच आयपीएलची प्रतिक्षा आता संपली आहे. आयपीएल २०२०चा पहिला सामना आज (१९ सप्टेंबर) आबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघात पार पडला आहे. हा सामना सीएसकेने ५ विकेट्सने जिंकला आहे.
सीएसके संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या मुंबई संघाने ९ विकेट्स गमावत १६२ धावा केल्या. मुंबईने दिलेले हे आव्हान सीएसके संघाने ५ विकेट्स गमावत १६६ धावा करत पूर्ण केले.
सीएसके संघाकडून खेळताना अंबाती रायडूने ४८ चेंडूत सर्वाधिक ७१ धावा केल्या. यात ३ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. सोबतच फाफ डू प्लेसिसनेही उत्कृष्ट फलंदाजी करत ४४ चेंडूत ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. सॅम करनने (१८) आणि जडेजाने (१०) धावा केल्या. कर्णधार एमएस धोनीला एकही धाव काढता आली नाही.
मुंबई संघाकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, जेम्स पॅटिन्सन, राहुल चाहर आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजीस उतरलेल्या मुंबई संघाकडून फलंदाजी करताना सौरभ तिवारीने ३१ चेंडूत सर्वाधिक ४२ धावा केल्या. यात १ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. सोबतच क्विंटन डी कॉक (३३), कायरन पोलार्ड (१८), सूर्यकुमार यादव (१७) आणि हार्दिक पंड्याने (१४) धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माला केवळ १२ धावाच करता आल्या.
सीएसकेकडून गोलंदाजी करताना लुंगी एन्गिडीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. सोबतच दीपक चाहर आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर पीयुष चावला आणि सॅम करनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
सीएसके आणि मुंबई संघ आतापर्यंत एकूण २९ वेळा आमने- सामने आले होते. त्यात १२ वेळा सीएसकेने, तर १७ वेळा मुंबईने विजय मिळविला आहे.
आयपीएल २०२० चा पुढील सामना उद्या (२० सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघात दुबई येथे सायंकाळी ७.३० वाजता खेळण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-या कारणामुळे चाहते धोनीवर चिडले; सोशल मीडियावर घेतला समाचार
-आयपीएलमध्ये फक्त ‘याच’ देशातील मीडियाला असेल परवानगी
-प्रसिद्ध निवेदिका मयंती लँगर कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर; कारणही आहे तसे खास
ट्रेंडिंग लेख-
-आजच्याच दिवशी युवराजने ६ चेंडूत ६ षटकार मारत रचलेला होता इतिहास, पहा व्हिडिओ
-‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार
-आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी