fbpx
Friday, January 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार

September 19, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

‘गुलाबी शहर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपुरमध्ये २०१९ आयपीएलमसाठीचा लिलाव सुरू होता. अनेक खेळाडूंवर करोडोंच्या बोल्या लागत होत्या. काही दिग्गज विकले जात नव्हते तर काही होतकरू क्रिकेटपटू चांगली किंमत घेत आयपीएलचा हिस्सा बनत होते. पंजाबमधील पतियाळाच्या एका घरात हा लिलाव शांतपणे पाहिला जात होता. लिलाव जसाजसा अखेरीकडे इकडे सरकू लागला तसे त्या घरातील लोकांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. कारण, या घरातील दोन मुले लिलावात सहभागी झाली होती.

अखेरीस, अनमोलप्रीत सिंग हे नाव पुकारले गेले. सर्वांनी देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली. कोलकाता नाईट रायडर्सने बोलीची सुरुवात केली पण मुंबई इंडियन्सने अनमोलवर ८० लाख रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात दाखल करून घेतले. काही वेळातच, याच घरातील दुस-या मुलाचे नाव देखील लिलावकर्त्याने घेतले. एक जण निवडला गेला होता. सर्वांना अपेक्षा होती की हा दुसरा मुलगा सुद्धा निवडला जाईल. झाले ही तसेच.. हैदराबाद, कोलकत्ता, राजस्थान, दिल्ली या संघांना मागे टाकत स्थानिक फ्रेंचाइजी किंग्स इलेव्हन पंजाबने १८ वर्षाच्या खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी तब्बल ४ कोटी ८० लाख इतकी रक्कम मोजली. पटियाळातील त्या घरात दिवाळी साजरी होत होती. ढोल वाजत होते, फटाके फोडले जात होते, शेजारीपाजारी सगळे नाचत होते. एकाच घरातील दोन मुले आयपीएल खेळणार होती. ४ कोटी ८० लाख रुपये मिळवणारा तो दुसरा मुलगा होता, प्रभसिमरन सिंग गिल..

१० ऑगस्ट २००० मध्ये पटियाळात प्रभासिमरनचा जन्म झाला. त्याच्या घरात क्रिकेटची कोणाला तितकीशी आवड नव्हती. मात्र, त्याच्यापेक्षा अवघ्या दोन वर्षांनी मोठा असलेला चुलत भाऊ अनमोलप्रीत क्रिकेट खेळू लागला आणि प्रभसिमरनला देखील क्रिकेट खेळायला आवडू लागले. दोन्ही भाऊ सोबतच क्लब क्रिकेट खेळत वेगवेगळ्या स्तरावर नावाजले जात होते.

अनमोल व प्रभसिमरन हे दोघे भाऊ पंजाब क्रिकेट चांगलेच गाजवत होते. अशातच, अनमोलची निवड २०१६ च्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघात झाली. हीच घटना प्रभसिमरनच्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. तेव्हापासून प्रभसिमरनने क्रिकेटकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली.

एका मुलाखतीत प्रभसिमरनने आपला आदर्शांबद्दल सांगताना म्हटले की, “अनमोल भैया माझा साथीदार व आवडता खेळाडू आहे. स्थापित क्रिकेटपटूंमध्ये वीरेंद्र सेहवाग माझे आदर्श आहेत. एक यष्टीरक्षक म्हणून आदर्श मात्र, ॲडम गिलख्रिस्टशिवाय दुसरे कोणतेही नाव डोळ्यासमोर येत नाही. ५० षटके यष्टीरक्षण करून देखील सलामीला उतरण्याची, त्याची शैली मला आवडते.”

जून २०१८ मध्ये, २३ वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत, प्रभसिमरनने ३०२ चेंडूत २९८ धावांची खेळी केली. दुर्दैवाने त्याची भारताच्या १९ वर्षाखालील संघात निवड झाली नाही. मात्र, त्याला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून निमंत्रण आले. १९ वर्षाखालील ५ यष्टीरक्षकांना भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे मार्गदर्शन करणार होते. प्रभसिमरनचा खेळ पाहून प्रभावित झालेले मोरे म्हणतात,

“मला प्रभसिमरनमध्ये भारताचे भविष्य दिसते. यष्टीरक्षक म्हणून त्याला अजून बरेच काम करायचे आहे. मात्र तो तुफानी फलंदाज आहे. त्याच्यात जबरदस्त गुणवत्ता आहे. मी तर म्हणेल, तो उजव्या हाताचा रिषभ पंत आहे.”

नोव्हेंबरमध्ये झालेल्या युवा आशिया चषक स्पर्धेत तो कर्णधार म्हणून सामील झाला. अंतिम फेरीत आयुष बदोनी व प्रभसिमरनने श्रीलंकन गोलंदाजांची तुफान धुलाई करत भारताला विजेते बनवले. याच खेळीच्या बळावर त्याला अवघा एक लिस्ट ए सामना खेळला असतानादेखील, पंजाबने करोडोंची किंमत देत निवडले होते.

अजून एकही प्रथमश्रेणी सामना तो खेळला नाही पण, गेल्यावर्षी त्याने आपले आयपीएल पदार्पण केले आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आपला एकमेव आयपीएल सामना खेळताना त्याने, भुवनेश्वर कुमार सारख्या अनुभवी गोलंदाजाला षटकार ठोकण्याची किमया केली होती.

आता सलग दुसऱ्या वर्षी तो किंग्स इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारतीय फिनिशर म्हणून या हंगामात प्रभसिमरनला अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रभसिमरन व भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने ही आयपीएल अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या हंगामात तो कशी कामगिरी करतोय, हे पाहणे रंजक ठरेल.

ट्रेंडिंग लेख –

हे ३ खेळाडू, जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा बनवू शकतात पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन

“नवा बोथम” म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफ विषयी १० रंजक गोष्टी

असे ३ खेळाडू, जे राजस्थान रॉयल्सला मिळवून देऊ शकतात दुसरे आयपीएल विजेतेपद

महत्त्वाच्या बातम्या – 

‘हा’ कर्णधार म्हणतोय, माझ्या संघामधील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कोणीही निराश नाही

रोहित-सचिन तर सर्वांनाच माहित आहे, परंतू हे ५ सितारेही झाले होते मुंबईचे कर्णधार

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला पहिल्यांदाच मिळाली तलवार भेट


Previous Post

हे ३ खेळाडू, जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा बनवू शकतात पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन

Next Post

आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी

Related Posts

Photo Curtsey: Twitter/ICC/BCCI
क्रिकेट

अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर कशी केली टीम इंडियाने ऑसींवर मात?, विहारीने केला खुलासा

January 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

कर्णधारपदासाठी वॉर्नरवर आजीवन आणि स्मिथवर केवळ २४ महिन्यांचीच बंदी का? दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न

January 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ IndSuperLeague
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालसमोर मुंबई सिटी एफसीचे आव्हान

January 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

“पंचांनी आम्हाला मैदान सोडण्याचाही पर्याय दिला होता, पण…”, मोहम्मद सिराजने उलगडला सिडनीतील वर्णद्वेषी शेरेबाजी प्रकरणाचा घटनाक्रम

January 21, 2021
Photo Courtesy: Instagram
क्रिकेट

मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले विराट आणि अनुष्का; पाहा व्हिडिओ

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
क्रिकेट

“बीसीसीआयने विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार करण्याचा विचार करावा”, इंग्लंडच्या माजी खेळाडूचे मत 

January 21, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL

आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी

Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau

जेव्हा जेव्हा चेन्नई पहिला सामना खेळलीय, तेव्हा तेव्हा पहा काय लागलाय स्पर्धेचा निकाल

Photo Courtesy: Facebook/IPL

जेव्हा जेव्हा मुंबई इंडियन्स पहिला सामना खेळलीय, तेव्हा तेव्हा पहा काय लागलाय स्पर्धेचा निकाल

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.