fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘हा’ कर्णधार म्हणतोय, माझ्या संघामधील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कोणीही निराश नाही

September 18, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी सांगितले की, रिकाम्या स्टेडियममध्ये खेळण वेगळंच असेल, परंतु त्याच्या संघाने आयपीएलमध्ये ‘बायो बबलमध्ये’ राहण्याचा आणि चाहत्यांशिवाय खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे, तर आरसीबी पहिला सामना २१ सप्टेंबरला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध खेळणार आहे.

विराट म्हणाला की, या स्पर्धेदरम्यान एकाचवेळी अनेकांना आंनदीत करण्याची संधी आमच्याकडे आहे. आरसीबी संघ २१ ऑगस्टला युएईमध्ये पोहचला आणि दोन आठवड्यांपासून सराव करीत आहे.

पत्रकार परिषदेत विराट म्हणाला, परिस्थिती स्वीकारणे हे सर्वात मोठे आव्हान होते. बायो बबलसह आपण जे काही उपलब्ध आहे, त्याचा स्वीकार करणे आणि त्याचे कौतुक करण्यास शिकलो आहोत. आता आम्हाला हे सर्व आरामदायी वाटते. तो म्हणाला, ‘जर आपण ते स्वीकारले नाही तर आजूबाजूच्या वातावरणामुळे आपण दु: खी किंवा निराश होऊ, परंतु माझ्या संघामधील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे. कोणीही निराश नाही.’

तो म्हणाला, आयपीएल प्रथमच प्रेक्षकांशिवाय खेळली जाईल. हे विचित्र असेल, याला नाकारता येणार नाही. परंतू, सराव सत्रानंतर समज थोडा बदलला आहे.

विराट म्हणाला, ‘शेवटी आम्ही खेळायला सुरुवात केली. कारण आमचे खेळावर प्रेम आहे. प्रेक्षक हा खेळाचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु आपण त्यासाठी खेळत नाही. स्टेडियम रिकामे ठेवण्याचा अर्थ असा नाही की आपल्या कामगिरीमध्ये कोणतीही कमतरता असेल. तो म्हणाला, या सर्वामागे एक मोठे कारण आहे, आपल्याकडे बर्‍याच लोकांना आनंद देण्याची हीच वेळ आहे.”

आरसीबीचा आयपीएल २०२० संघ-

विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, ख्रिस मॉरिस, जोश फिलिप, मोईन अली, आरोन फिंच, एबी डिविलियर्स, शाहबाज अहमद, पार्थिव पटेल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, इसुरु उदाना, डेल स्टेन, पवन नेगी, देवदत्त पद्धिकल, शिवम दुबे , उमेश यादव, गुरकीरत मान सिंह, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अ‍ॅडम झम्पा


Previous Post

रोहित-सचिन तर सर्वांनाच माहित आहे, परंतू हे ५ सितारेही झाले होते मुंबईचे कर्णधार

Next Post

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा ‘तो’ सेल्फी खूपच होतोय व्हायरल

Related Posts

Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

“इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ‘ही’ गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन”, अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज 

January 26, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ HomeOfCricket

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा 'तो' सेल्फी खूपच होतोय व्हायरल

Photo Courtesy: Twitter/IPL

या कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स आहे आयपीएल विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार

Photo Courtesy: Facebook/IPL

असे ३ खेळाडू, जे राजस्थान रॉयल्सला मिळवून देऊ शकतात दुसरे आयपीएल विजेतेपद

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.