fbpx
Sunday, February 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजच्याच दिवशी युवराजने ६ चेंडूत ६ षटकार मारत रचलेला होता इतिहास, पहा व्हिडिओ

September 19, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

आजच्याच दिवशी 13 वर्षांपूर्वी 19 सप्टेंबर 2007 ला भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू यूवराज सिंगने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 6 चेंडूत 6 षटकार मारत इतिहास घडवला होता. त्याने 2007 ला झालेल्या पहिल्या आयसीसी टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता.

या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी 18 व्या षटकात इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि युवराजमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर युवराजने 19 व्या षटकात 21 वर्षीय स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर 6 चेंडूत 6 षटकार मारले होते. त्यावेळी तो हर्षल गिब्सनंतरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारणारा दुसराच फलंदाज ठरला होता.

युवराजने या षटकातील पहिल्या चेंडूवर मिडविकेटला षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने स्क्वेअर लेगला षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवर वाईड लॉन्ग ऑफवर युवराजने षटकार मारला.

नंतर फुलटॉस आलेल्या चौथ्या चेंडूवरही युवराजने षटकार खेचला. यानंतर युवराजने पाचव्या चेंडूवर स्क्वेअर लेगला तर षटकातील शेवटच्या चेंडूवर वाईड लॉन्ग ऑनला षटकार मारला.

युवराजने हे षटकार मारण्याबरोबरच 12 चेंडूत त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा कारनामा केला. आजही त्याचा हा विक्रम अजून कोणी मोडलेला नाही.

या सामन्यात युवराजने 16 चेंडूत 58 धावा केल्या होत्या. त्याच्या या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 218 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला विजयासाठी 219 धावांचे आव्हान दिले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकात 6 बाद 200 धावा करता आल्या होत्या. त्यामुळे भारताने या सामन्यात 18 धावांनी विजय मिळवला होता.

या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही युवराजला देण्यात आला होता. पुढे भारताने या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवत पहिल्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपदही मिळवले होते.

#OnThisDay in 2007…@YUVSTRONG12 v @StuartBroad8.

6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣ 😲

Six sixes in an over, and the fastest ever T20I fifty, off just 12 balls! 🔥 pic.twitter.com/xYylxlJ1b6

— ICC (@ICC) September 19, 2018

6⃣6⃣6⃣6⃣6⃣6⃣#OnThisDay in 2007, @YUVSTRONG12 etched his name into the record books by hitting six sixes in an over. 💪💪 pic.twitter.com/VDKAQJLof2

— BCCI (@BCCI) September 19, 2019

तसेच मागीलवर्षी जूनमध्ये युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. पण त्याच्या कारकिर्दीतील इंग्लंड विरुद्ध मारलेले हे 6 चेंडूतील 6 षटकार सर्वांनाच्याच कायम आठवणीत राहिले.

ट्रेंडिंग लेख –

हे ३ खेळाडू, जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा बनवू शकतात पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन

असे ३ खेळाडू, जे राजस्थान रॉयल्सला मिळवून देऊ शकतात दुसरे आयपीएल विजेतेपद

“नवा बोथम” म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफ विषयी १० रंजक गोष्टी

महत्त्वाच्या बातम्या – 

या कारणामुळे चाहते धोनीवर चिडले; सोशल मीडियावर घेतला समाचार

प्रसिद्ध निवेदिका मयंती लँगर कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर; कारणही आहे तसे खास

आयपीएलचा पहिला सामना कुठे, कधी आणि कसे पाहणार? वाचा सविस्तर


Previous Post

या कारणामुळे चाहते धोनीवर चिडले; सोशल मीडियावर घेतला समाचार

Next Post

आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला आली लसिथ मलिंगाची आठवण म्हणाला…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/MumbaiCityFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१: एटीके मोहन बागानला गारद करीत मुंबई सिटीच अव्वल

February 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ IndSuperLeague
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१: हैदराबादविरुद्ध गोलशून्य बरोबरीसह गोवा बाद फेरीत दाखल

February 28, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCIDomestic
क्रिकेट

आरसीबीसाठी आनंदाची गोष्ट! ‘या’ खेळाडूने ठोकलंय सलग तिसरं शतक, ५ सामन्यात ५०० पेक्षा अधिक धावा

February 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
इंग्लंडचा भारत दौरा

विराटच्या शतकांचा दुष्काळ संपेना ! ‘इतके’ सामने झाले नाही उंचावली बॅट

February 28, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

भारताविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद

February 28, 2021
Photo Courtesy:
Twitter/@BCCI
इंग्लंडचा भारत दौरा

‘विचार करतोय चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल?’ रोहितचा टीकाकारांना टोमणा

February 28, 2021
Next Post

आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला आली लसिथ मलिंगाची आठवण म्हणाला...

'या' ६ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल आजच्या आयपीएल सामन्याचा निकाल

सीएसकेसाठी आनंदाची बातमी! पहिल्या सामन्याआधी क्वारंटाईनमधून बाहेर आले हे ३ दिग्गज खेळाडू

Please login to join discussion
ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.