इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या मोसमाला येत्या 19 सप्टेंबरपासून युएईत सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिला सामना आबू धाबी येथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे.
आयपीएलमध्ये आत्तापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संघामध्ये चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स बरोबरच सनरायझर्स हैद्राबादचेही नाव घेतले जाते. आयपीएलमध्ये हैद्राबादचा संघ 2013 पासून खेळत आहे.
त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या 7 मोसमांपैकी 5 वेळा पहिल्या 4 संघांमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच 2016 ला त्यांनी विजेतेपदही जिंकले आहे. तर 2018 ला हैद्राबाद संघ उपविजेता ठरला होता. आता यावर्षी त्यांचा आयपीएलचे दुसरे विजेतेपद जिंकण्याचा इरादा असेल.
हैद्राबाद संघाने यावर्षीच्या आयपीएलसाठी त्यांच्या संघात 19 वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्गचा समावेश केला आहे. तसेच त्यांनी मिशेल मार्श, फॅबियन ऍलेन या परदेशी खेळाडूंनाही संघात सामील केले आहे. त्याचबरोबर त्यांच्या संघात डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, मनिष पांडे, जॉनी बेअरस्टो असे स्टार खेळाडूही आहेत.
यावर्षी हैद्राबादचा पहिला सामना 21 सप्टेंबरला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध आबू धाबी येथे होणार आहे. या मोसमात हैद्राबादच्या साखळी फेरीतील 13 सामन्यांपैकी 9 सामने रात्री 7.30 वाजता सुरु होतील. तर 4 सामने दुपारी 3.30 वाजता सुरु होईल.
असे आहे आयपीएल 2020मधील सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक –
२१ सप्टेंबर, सोमवार: हैद्राबाद विरुद्ध बेंगलोर, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२६ सप्टेंबर, शनिवार: कोलकाता विरुद्ध हैद्राबाद, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२९ सप्टेंबर, मंगळवार: दिल्ली विरुद्ध हैद्राबाद, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२ ऑक्टोबर: शुक्रवार: चेन्नई विरुद्ध हैद्राबाद, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
४ ऑक्टोबर: रविवार: मुंबई विरुद्ध हैद्राबाद, शारजहा, रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
८ ऑक्टोबर: गुरुवार: हैद्राबाद विरुद्ध पंजाब, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
११ ऑक्टोबर: शनिवार: राजस्थान विरुद्ध हैद्राबाद, दुबई, रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
१३ ऑक्टोबर: रविवार: हैद्राबाद विरुद्ध चेन्नई, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१८ ऑक्टोबर: शुक्रवार: हैद्राबाद विरुद्ध कोलकाता, आबुधाबी, रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
२४ ऑक्टोबर: सोमवार: पंजाब विरुद्ध हैद्राबाद, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२७ ऑक्टोबर: सोमवार: हैद्राबाद विरुद्ध दिल्ली, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३१ ऑक्टोबर: शनिवार: बेंगलोर विरुद्ध हैद्राबाद, शारजहा, रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
३ नोव्हेंबर: मंगळवार: मुंबई विरुद्ध हैद्राबाद, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
आयपीएल 2020 साठी असा आहे सनरायझर्स हैद्राबादचा संघ-
केन विल्यम्सन, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, विजय शंकर, राशीद खान, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, जॉनी बेअरस्टो, वृध्दिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, शाहबाज नदीम, बिली स्टॅनलेक, बासिल थंपी, टी नटराजन, मिशेल मार्श, प्रियम गर्ग, विराट सिंग, फॅबियन ऍलन, संदीप बावनका, अब्दुल समद, संजय यादव.