आयपीएल २०२०: असे आहे सनरायझर्स हैद्राबादचे वेळापत्रक; जाणून घ्या कधी व केव्हा होणार सामने

इंडियन प्रीमीयर लीगच्या(आयपीएल) 13 व्या मोसमाला येत्या 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिला सामना मुंबईत गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे.

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संघामध्ये चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स बरोबरच सनरायझर्स हैद्राबादचेही नाव घेतले जाते. आयपीएलमध्ये हैद्राबादचा संध 2013 पासून खेळत आहे.

त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या 7 मोसमांपैकी 5 वेळा पहिल्या 4 संघांमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच 2016 ला त्यांनी विजेतेपदही जिंकले आहे. तर 2018 ला हैद्राबाद संघ उपविजेता ठरला होता. आता यावर्षी त्यांचा आयपीएलचे दुसरे विजेतेपद जिंकण्याचा इरादा असेल.

हैद्राबाद संघाने यावर्षीच्या आयपीएलसाठी त्यांच्या संघात 19 वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्गचा समावेश केला आहे. तसेच त्यांनी मिशेल मार्श, फॅबियन ऍलेन या परदेशी खेळाडूंनाही संघात सामील केले आहे. त्याचबरोबर त्यांच्या संघात डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, मनिष पांडे, जॉनी बेअरस्टो असे स्टार खेळाडूही आहेत.

यावर्षी हैद्राबादचा पहिला सामना 1 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध घरच्या मैदानावर म्हणजेच हैद्राबाद येथे होणार आहे. या मोसमात हैद्राबादच्या साखळी फेरीतील 14 सामन्यांपैकी 13 सामने रात्री 8 वाजता सुरु होतील. तर 12 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणारा सामना दुपारी 4 वाजता सुरु होईल.

असे आहे आयपीएल 2020मधील सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक – 

1 एप्रिल, बुधवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स – हैद्राबाद, रात्री 8 वाजता

4 एप्रिल, शनिवार: किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – मोहाली, रात्री 8 वाजता

7 एप्रिल, मंगळवार: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – बंगळुरु, रात्री 8 वाजता

12 एप्रिल, रविवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स – हैद्राबाद, दुपारी 4 वाजता

16 एप्रिल, गुरुवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – हैद्राबाद, रात्री 8 वाजता

19 एप्रिल, रविवारः चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – चेन्नई, रात्री 8 वाजता

21 एप्रिल, मंगळवार: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – जयपूर, रात्री 8 वाजता

26 एप्रिल, रविवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – हैदराबाद, रात्री 8 वाजता

30 एप्रिल, गुरुवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – हैद्राबाद, रात्री 8 वाजता

3 मे, रविवारः दिल्लीची कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – दिल्ली, रात्री 8 वाजता

5 मे, मंगळवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – हैद्राबाद, रात्री 8 वाजता

9 मे, शनिवारः मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – मुंबई, रात्री 8 वाजता

12 मे, मंगळवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब – हैद्राबाद, रात्री 8 वाजता

15 मे, शुक्रवार: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – कोलकाता, रात्री 8 वाजता

आयपीएल 2020 साठी असा आहे सनरायझर्स हैद्राबादचा संघ –

केन विल्यम्सन, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, विजय शंकर, राशीद खान, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, जॉनी बेअरस्टो, वृध्दिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, शाहबाज नदीम, बिली स्टॅनलेक, बासिल थंपी, टी नटराजन, मिशेल मार्श, प्रियम गर्ग, विराट सिंग, फॅबियन ऍलन, संदीप बावनका, अब्दुल समद, संजय यादव.

You might also like