---Advertisement---

भारतीय क्रिकेटरबरोबर पार्टी करताना दिसली आंद्रे रसेलची पत्नी, हुक्का घेत…

---Advertisement---

नवी दिल्ली। आयपीएल २०२० चा हंगाम शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. यातील साखळी सामने संपले आहेत. सोबतच क्वालिफायर १ सामनाही झाला. परंतु २ वेळचा आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ साखळी फेरीतूनच बाहेर पडला आहे. त्यांनी या हंगामात १४ सामन्यांपैकी केवळ ७ सामन्यात विजय मिळवला. परंतु त्यांना खराब नेट रनरेटमुळे साखळी सामन्यातूनच बाहेर पडावे लागले. असे असले तरी कोलकाताचे खेळाडू अजूनही दुबईत आहेत. आणि जैव- सुरक्षित वातावरणातून बाहेर पडत दुबईसारख्या सुंदर शहरात फिरण्याचा घेताना दिसत आहेत.

कोलकाताचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलची पत्नी जॅसिम लोरादेखील यावेळी दुबईतच आहे. तिने आपला एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये जॅसिम एका नाईट क्लबमध्ये बसलेली आहे. जॅसिम या व्हिडिओत हुक्का पिताना दिसत आहेत.

कोलकाताचे अनेक खेळाडूही जॅसिमसोबत आहेत. संघाचा मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज नितीश राणाही जॅसिमसोबत दिसत आहे.

जॅसिमचा पती आंद्रे रसेलसाठी आयपीएल २०२० चा हंगाम खूपच खराब ठरला. त्याने १० सामने खेळताना केवळ ११७ धावा केल्या आणि गोलंदाजी करताना केवळ ६ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या बाजूला नितीश राणाने या हंगामात १४ सामन्यात २५.१४च्या सरासरीने ३५२ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

-ब्रेकिंग ! गौतम गंभीर सेल्फ आयसोलेट, स्वतः ट्विट करून दिली माहिती

-ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी कोहलीचे मोठे भाष्य, ‘या’ कारणामुळे दौरे मोठे नसावेत

-“वैयक्तिक कीर्तिमान महत्वाचे परंतु…”, दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमारची खास प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---