---Advertisement---

कोलकाता नाइट रायडर्स संघाला दुसरा झटका; हा खेळाडू झाला स्पर्धेबाहेर

On: गुरूवार, ऑगस्ट 27, 2020 8:58 PM
---Advertisement---

मुंबई । कोलकाता नाइट रायडर्सला इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामापूर्वी दोन मोठे धक्के बसले आहेत.  माजी अनुभवी फिरकीपटू प्रवीण तांबेला आयपीएल खेळण्यास बंदी घातली आहे आणि आता संघाचा वेगवान गोलंदाज या हंगामात खेळताना दिसणार नाही.  दुखापतीमुळे इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज हॅरी गार्नी आयपीएलसह अनेक स्पर्धांमधून बाहेर पडला आहे.  मागील वर्षी, त्याने केकेआरसाठी 8 आयपीएल सामने खेळले होते.

नॉटिंघमशायरचा वेगवान गोलंदाज असलेला 33 वर्षीय हॅरी गार्नी हा 2020 टी -20 ब्लास्ट लीगला मुकणार आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला आयपीएल आणि या स्पर्धेतून बाहेर पडावे लागणार आहे.  आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या हॅरीचे पुढच्या महिन्यात ऑपरेशन होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. पण तो बरा होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे तो क्रिकेट खेळू शकणार नाही.

डावखुरा वेगवान गोलंदाज हॅरीने ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, “या हंगामातील आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळण्यासाठी मी युएईला जाणार नाही. या वर्षी होणाऱ्या टी 20 ब्लास्टमध्येही मी खेळणार नाही.”

“माझ्या कारकीर्दीतील सर्वात मोठे क्षण नॉटिंघॅमबरोबर होते. ट्रेंट ब्रिज येथील मैदानावर माझ्या सहकारी खेळाडूंसह ट्रॉफी जिंकण्याची तुलना कशाशीही करता येणार नाही. एक वर्ष क्रिकेटपासून दूर जाणे कठीण आहे. माझे संघ सहकारी अंतिम सामन्यापर्यंत चांगला खेळ करतील असा मला विश्वास आहे. जेव्हा जेव्हा सल्ला किंवा रणनीती आखण्यासाठी माझी गरज असेल तेव्हा मी तिथे हजर असेन,” असे हॅरी गार्नीने सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---