आयपीएलच्या १३ व्या हंगामातील २१ वा सामना बुधवारी (७ ऑक्टोबर) अबू धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळानुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. या हंगामात आतापर्यंत कोलकाताने ४ पैकी २ सामने जिंकले आहेत आणि २ सामने गमावले आहेत. दुसरीकडे चेन्नईने ५ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत.
बुधवारी होणाऱ्या सामन्यादरम्यान कोलकाता आणि चेन्नईच्या खेळाडूंना काही खास विक्रम करण्याची संधी आहे. त्याच विक्रमांचा आढावा आपण घेऊया.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगणाऱ्या सामन्यात होऊ शकतात हे विक्रम –
– या सामन्यात ओएन मॉर्गनने १० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण करेल
– आंद्रे रसलने या सामन्यात ५२ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये १५०० धावा पूर्ण करेल.
– कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने जर या सामन्यात ५३ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण करेल.
-चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने जर या सामन्यात ५१ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी ४००० धावा पूर्ण करेल.
– अंबाती रायडूने या सामन्यात जर ३७ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो चेन्नई सुपर किंग्ससाठी १००० आयपीएल धावा पूर्ण करेल.
– फाफ डु प्लेसिसने या सामन्यात ७९ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो चेन्नई सुपर किंग्ससाठी २००० आयपीएल धावा पूर्ण करेल.
– आंद्रे रसलने या सामन्यात ४ किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारले तर तो आयपीएलमध्ये १०० चौकारांचा टप्पा पार करेल.