बहुप्रतिष्ठित टी२० लीग आयपीएल २०२० मधील २१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात बुधवारी (७ ऑक्टोबर) अबू धाबी येथे झाला. हा सामना कोलकाताने १० धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्याचा हीरो राहुल त्रिपाठी ठरला. त्याने ५१ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु असे असले तरी कर्णधार एमएस धोनी सध्या चर्चेत आहे.
नाणेफेक जिंकत कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १६७ धावा केल्या होत्या. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई संघाने ५ विकेट्स गमावत १५७ धावाच केल्या आणि सामना गमावला. या सामन्यात चेन्नईकडून शेन वॉटसनने सर्वाधिक (५०) आणि अंबाती रायडूने (३०) धावा केल्या.
१९ व्या षटकात कोलकाता संघाने १६६ धावा केल्या होत्या. त्यावेळी शेवटचे षटक ड्वेन ब्राव्होला देण्यात आले होते, तर फलंदाजी शिवम मावी करत होता. धोनीने ब्राव्होला यष्टीमागून चेंडू दूर टाकण्याचा इशारा केला. त्याने आपल्या एका हातातील ग्लोव्हज काढले होते. ब्राव्होने धोनीने सांगिल्याप्रमाणे केले आणि मावीने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू बॅटची कड लागून धोनीकडे गेला. चेंडू थोडा वर होता. त्यामुळे धोनीने चेंडू आधी एका हाताने थांबविला त्यानंतर तो उडी मारून झेलला. त्यावेळी धोनीची ही चपळता पाहून सर्व खेळाडू आश्चर्यचकीत झाले होते.
धोनीचा हा व्हिडिओ ट्विटरवर जोरदार व्हायरल होत आहे. चेन्नईने हा सामना गमावला असला, तरी धोनीची प्रशंसा केली जात आहे. एका चाहत्याने लिहिले की, “जंगलात सिंह कितीही म्हातारा झाला असला, तरी तो शिकार करणे कधीच विसरत नाही. अगदी असेच क्रिकेटमध्ये धोनीसाठीही आहे.” त्यानंतर दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, “या जंगलाचा राजा फक्त धोनीच आहे.”
Remember one thing how old the Lion🦁 be @msdhoni He is always the king of the Jungle #MSDhoni #KKRvCSK pic.twitter.com/36gv6GHo1v
— blogger._.bunny (@aslamkoheri) October 7, 2020
https://twitter.com/live_cricvideos/status/1313871924750024705
https://twitter.com/rajinimohan1212/status/1313881002402406400
https://twitter.com/DeepTweets007/status/1313871516707160064
Totally love this man💛❣️🙌 cheetah 😎 #MSDhoni #CSKvsKKR #IPL2020 pic.twitter.com/Hq44bQ8oCM
— Shweta SK (@Shweta7770) October 7, 2020
चेन्नई संघ एकेकाळी १० षटकांमध्ये केवळ १ विकेटवर ९० धावांच्या मजबूत स्थितीत होता. परंतु सुनील नरेनने (३१ धावांवर १ विकेट), वरूण चक्रवर्ती (२८ धावांवर १ विकेट) आणि आंद्रे रसेलने (१८ धावांवर एक विकेट) शेवटच्या १० षटकांमध्ये शानदार गोलंदाजी करत कोलकाता संघाला जोरदार पुनरागमन करून दिले आणि विजय मिळवून दिला.